कथा - 1- ।।बांध ।। ग्रामीण कथा
कथा - 1- ।।बांध ।। ग्रामीण कथा
( प्रसिद्धी -:साप्ताहिक तांबडी माती दिवाळी अंक -साल -२०००. )

मनोगत -आज भारताला स्वातंत्र मिळूनही इतके वर्ष झाले तरी एकीकडे देश घडविताना दुसरीकडे भारताच्या सरहद्दीला युद्धाचा धोका आजही जाणवत आहे . आज भारताला देशाच्या प्रगतीबरोबर सिमेचे सरंक्षण हि करावे लागत आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे . सिमेवर युद्धाचे संकट आले तरी भारतातील शहरी व ग्रामीण नागरिक देशासाठी आपले घरातील मोठ्या समस्या बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेसाठी अजूनही लढत आहे .
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांनी "जय जवान जय किसान "हा मंत्र पूर्वीचा दिलेला आहे . त्यानुसार भारताची देशभक्ती घडत गेलेली आहे . ह्या युद्ध संकटावर हि कथा लिहली आहे . ---जय हिंद
।।बांध ।।
" रंग्या ,मुकाट कुऱ्हाड माघारी घे -माझ्याकडेही फरशी आहे उगा भावाच्या रक्ताने न्हाल्या नग"
त्यावर रंगनाथ पाटील रागाने म्हणाला "अरे जा रे मोठं भावाचे नाते सांगतुया वर माझ्या विरुद्ध कोर्टात केस दाखल करून वर रुबाब करतोय "मग तितक्यात शेताच्या बांधावर बरीच माणसांची गर्दी झाली. गावातील शहाणी माणसे भांडणाची बातमी कळताच धावून आली व नेहेमीप्रमाणे मध्ये पडली .व रंगनाथ पाटलाला एकीकडे व दुसरीकडून सखाराम पाटलाला बाजूला ओढत होती .भांडण जवळ जवळ मिटतच होते .तितक्यात
सखाराम पाटलाचा उनाड मुलगा बंडू पाटील तेथे रागारागाने काठी घेऊन पळत आला . त्याच्या बरोबर २/३
लोकंपण होते आल्या आल्या त्याने रंगनाथ पाटलाची गचांडी धरून लांब ढकलले व काठी उगारून रंगनाथ पाटलाच्या अंगावर धावला .मग रंगनाथ पाटलाच्या बरोबर आलेली ३/४ माणसे सुद्धा चवताळून बंड्या व त्याच्या साथीदारांवर तुटून पडली दोन्हीकडून काठ्यांचा कडकडाट शेताच्या बांधावर घुमू लागला .
जणू आता शेताच्या बांधाला एखाद्या रणभूमीचे स्वरूप आले .मग कुणीतरी धावत जाऊन पोलिसांना घेऊन आले .तेव्हा कोठे प्रकरण थोडे सावरत आले .परंतु दोन्ही पार्ट्यांच्या शिवीगाळी व भांडणे चालूच होते . सखाराम पाटलाचा मुलगा बंड्या पाटील शिव्या देत म्हणाला "हरामखोरा अरे चुलता आहेस कि सैतान .माझ्या बापाची जमीन बळकावून रात्रीच्याला खोटा बांध उभारतोया बघतो आमची जमीन कशी ताब्यात देत नाहीस ते "
आत्तापर्यंत बाजूला उभा असलेला सखाराम पाटील पुढे आला व त्याने पुढे होऊन बंड्याच्या मुस्काटात मारली . व संतापाने ओरडला "हरामखोरा चल तू बाजूला हो मुकाट भांडण माझें व रंगनाथचे आहे .शेतावर काम करावयाचे सोडून गावात उनाडक्या करतो आन नेमक्या भांडणतंट्याच्या वेळेला शेतावर उलथतो ."
बापाची सर्वांदेखत मुस्काटात खाऊन बंड्या संतापाने ओरडला " आबा ह्या टायमाला म्या बाजूला होतो आपली १० एकर जमीन ह्या तुमच्या भावाने लाटली आहे ,अन तुम्ही गुमान सगळं डोळ्यांनी मुकाट बगतयासा "
त्यावर दुसऱ्या बाजूने रंगनाथ पाटील कडाडला "अरे डुक्करा पाहिलांदा पुरावा दाव म्हण तुझ्या बापाला कोर्टात मग गाठतो वर बांधाच्या " मग सगळ्या बघ्या मंडळींनी दोन्ही पार्ट्याना कसे बसे गावाकडे ढकलले .
किमान ७/८ हजार वस्तीचे विलासपूर हे एक खेडेगाव होते . बहुसंख्या मंडळी गावातील शेतीवाडी. मेंढरेपालन
व दुग्ध व्यवसाय . करीत होते . परंतु गावात रंगनाथ पाटील व सखाराम पाटील हे दोघे सक्खे चुलत भाऊ.
जमीन कसत होते . सखाराम पाटलाची १५ एकर जमीन व रंगनाथ पाटलाची ३५ एकर जमीन एकमेकाला लागून होती .परंतु आपली १० एकर जमीन रंगनाथ पाटलाने खोटा बांध करून व गफलत करून घेतल्याचा
आरोप २० वर्षांपासून केला होता . सखारामच्या म्हणण्यानुसार हि एकूण जमीन ५० एकर होती .व पिढीजात होती ,भावकीच्या काळात दोघांच्या आजोबाची शेतावर भांडणे झाली होती . म्हणून पणजोबांनी पुढे वाद नको म्हणून २५ एकर सखारामच्या आजोबाला व २५ एकर रंगनाथच्या आजोबाला वाटणी करून दिली .
दरम्यान दोघांच्या वडिलांच्या काळात सततच्या पावसामुळे हळू हळू मातीचे भर एका साईडला करून रंगनाथ पाटलाच्या वडिलांनी सखाराम पाटलांच्या वडिलांच्या गरीब स्वभावाचा फायदा घेतला . कारण सखाराम पाटलाच्या दुर्देवाने सखारामच्या वडिलांना दम्याचा जोरदार आजार झाला व एकाएकी सखाराम पाटलाचे वडील ऐन उमेदीत मरण पावले . मग रंगनाथ पाटलाचे वडील अत्यंत बेरकी व पाताळयंत्री होते . त्यांनी सरकार दरबारी पैसे लाच देऊन व एकीकडे मुले मोठी होई पर्यंत मी सर्व काही सांभाळतो सगळे असे
सखारामच्या आईला आश्वासन दिले. व जवळ जवळ १० एकर सखारामच्या वडिलांची जमीन बळकावली व
नंतर सखाराम पाटलाने शाळा सोडून शेती पाहण्यास सुरवात केली पण उशीर झाला . तोपर्यंत रंगनाथ पाटलांनी दहा एकर जादा जमिनेचे कागद करून घेतले व काही दिवसानी रंगनाथ पाटलाचे वडील मरण पावले.
आता दोन्ही पाटील घराण्यात हार्डवैर निर्माण झाले . रीतसर मग सखाराम पाटलांनी कोर्टात दावा दाखल केला .मग कोर्ट मध्ये सततच्या तारखा व वकिलाचे हेलपाटे .वकिलाची भरमसाठ फी .ह्या गोष्टी रीतसर चालू झाल्या . रंगनाथ पाटील हा त्याच्या वडिलांप्रमाणे बेरकी व पाताळयंत्री होता. आता बांधावरून कटकटी नित्याचाच झाल्या . त्यामध्ये आता ह्या शेतीच्या बांधासाठी परस्परांशी लढण्यासाठी तिसरी पिढी उतरली होती .. रंगनाथ पाटलाचा मुलगा श्रीपती व सखाराम पाटलाचा मुलगा बंडू ह्या दोघांचे भांडणे मग विलासपूर गावात सुरु झाली. दोघेही सारखेच उडाणटप्पू व उनाड रंगनाथ पाटलाची आर्थिक परिस्थिती सखाराम पाटलापेक्षा चांगली होती. त्यामुळे गावात श्रीपती मोटारसायकल घेऊन फिरत आणि बंडू पाटीलला हे बघवत नसे . आपल्या टुक्कार मित्रांना तो म्हणायचा , " साला माझ्या बापाची जमीन हडप करून वर रुबाबात हिंडतोय " हे बघून बंडूच्या तळपायांची आग मस्तकाला जात असे .
सखाराम पाटलाला दोन मुले मोठा सदानंद व धाकटा बंडू .पण दोघांचाही स्वभाव परस्परविरोधी होता .
बंडू हा उनाड व गावात नुसती पैलवानकी करत हिंडायचा कसाबसा गावाच्या शाळेत मॅट्रिक झाला. तालुक्याच्या गावी एक वर्ष कॉलेजमध्ये काढून कॉलेजला रामराम ठोकला . 'बस्स झाले शिक्षण म्हणून आता आपल्या घराची शेतीची समस्या बघावयास हवी एकतर दहा एकर जमीन रंगनाथ पाटलांनी हडप केली . उरली सुरली सुद्धा श्रीपतीच्या मदतीने गायब करावयाचा व आपल्या बापाला फसवायाचा . एखादा वेळी . ह्या हेतूने बंडूने कॉलेज सोडले व सखारामच्या शेतावर चकरा मारून वेळ काढून रंगनाथ पाटलाशी बांधावरून भांडत असे . सखाराम पाटलाचा मोठा मुलगा अत्यंत हुशार होता संपूर्ण विलासपूर गावात त्याने नाव काढले .
सखाराम पाटलाने घरातील बांधाच्या भांडणामुळे उगाच वाया जाऊ नये म्हणून त्याच्या मामाकडे शिकावयास ठेवले . व तेथे त्याने घराण्याचे नाव काढले . सदानंद शिकून चांगला इंजिनिअर झाला. एका मोठ्या कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कामाला लागला . आपला मोठा भाऊ परत शेती करायला येणार नाही .ह्याची बंडूला खात्री पटली , आता शेताच्या कामापेक्षा शेत बांधावरून भांडण्यात त्याचा वेळ खर्च होत . वडील सखाराम पाटील शेतीचे कामकाज बघतील व मी जमिनीचे कोर्टातील वादविवाद बघून घेईल अशी स्वतःच बंडूने कामाची वाटणी केली . मोठा भाऊ सदानंद रजा घेऊन विलासपूरला येत व तो बंडूला सारखे समजावत असे ,
"अरे ,उनाडक्या सोडून आता जरा चांगल्या मार्गाला लाग,वगैरे ," व हा शेतीचा बांधाचा प्रश्न शांततापूर्वक व तडजोडीने सुटेल व भांडणे मिटतील ह्या हेतूने तो रंगनाथ पाताळाशी सुद्धा कधी कधी भेट घेत असे . पण त्याचा फारसा उपयोग होत नसे . सदानंद मुंबईला गेल्यावर परत भांडणे चालू होत ,
एकदा सखाराम पाटील शेतावर गेले असताना रंग्नाथाचा मुलगा श्रीपती ह्याची गाठ पडली ,
थोड्या कूट बुद्धीने दोघांची भांडणे झाली ,वयाचा मान न राखता श्रीपती सखारामला काही तरी उलटून बोलला . बंडूला निमित्त मिळाले आपल्या वडिलांचा मान न राखता उद्धटपणे श्रीपती बोलल्याचे बंडूला कळले मग संघ्याकाळी श्रीपती गावात आल्यावर बंडूने त्याची मोटारसायकल अडविली व त्याला आपल्या वडिलांशी भांडल्याचा जाब विचारला .मग शब्दाने शब्द वाढला व दोघांची प्रचंड मारामारी भर गावात झाली .मोठ्या लोंकानी सोडविली . त्यामध्ये बंडूने श्रीपतीला बेदम मारले रीतसर पोलीस आले व बंडूच्या विरुद्ध पोलीस केस झाली . परिस्थितीजन्य पुराव्यामुळे बंडूला तीन महिने तुरुंगवासाची सजा झाली. कटकटी वाढत जाईल म्हणून मोठ्या मुश्किलीने सखाराम पाटलांनी पै पैसे भरून आठ दिवसाने बंडूला पोलीस कचाट्यातून सोडवले व घरी आणले . त्या दिवशी रात्री बंडूचे व वडिलांचे प्रचंड भांडण झाले . सखाराम पाटील बंडूला म्हणाले ," हे बघ बंड्या ह्या माझ्या शेतीच्या कटकटीत तू अजिबात भाग घ्यायचा नाही . माझ्या शेतीचे भांडण म्या अन तो रंग्या बघून घेईल . आता तूझ्या उनाडक्या बस कर , मुकाट शेतीत मदत कर दुसरा नोकरी धंदा बघ ,नाही तर माझ्या घरात राहू नकोस " त्यावर आतापर्यंत तापट व रागीट असलेला बंडू शांतपणे प्रथमच म्हणाला "आबा तुम्ही पहिल्यापासून बघताय मला अन्याय व अत्याचार सहन होत नाही माझे रगात लयी तापतय " त्यावर सखाराम रागाने म्हणाला "हे तुझे रगात आता चांगल्या कामासाठी खर्च कर, ह्या तुझ्या रगताचे पाणी करून काही तरी भले काम करून दाव मला ." त्यावर बंडू काहीच बोलला नाही आणी ... त्याचा दिवशी रात्री बंडू घरात कुणालाही न सांगता बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सुद्धा घरी परतलाच नाही ,
सखाराम पाटील बायकोला म्हणाले, " गेला असेल मामाच्या घराला उनाडक्या करायला "असे म्हणून शेतावर निघून गेले . ऐक प्रकारे त्यांच्या दृष्टीने ते आता बरेच झाले होते . कारण बंडूचा हस्तक्षेप त्यांना आता अवघड वाटत होता . चार दिवस उलटले . मग पाचव्या दिवशी एक टेलिग्राम सखाराम पाटलाच्या घरी आली .
खाली बंडूचे नाव होते . शेजारच्या मास्तरांकडून तार वाचली . त्यात बंडू हा सैन्यात भरती झाला होता. सैन्य प्रशिक्षणासाठी डेहेराडून येथे गेला होता. मास्तर पाटलांना म्हणाले "चला पाटील काळजी करू नका . ह्या निमित्ताने का होईना बंडू मार्गाला लागला ." पण सखाराम पाटलाला मात्र काहीतरी हरवल्यासारखे वाटले ,
बंडू पाटील वडिलांशी भांडून थेट दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावी गेला. त्याची धिप्पाड शरीरयष्टी . उंची. व ताकद बघून त्याची लगेच भरती होऊन तो प्रक्षिशणासाठी डेहेराडून येथे रवाना झाला.
बोलता बोलता चक्क वर्ष उलटले . बंडूचे नित्यनियमाने पत्रे येत . व मी पंधरा दिवसाच्या रजेवर येणार असल्याचेही कळविले . बंडूने सैन्य प्रशिक्षणामध्ये अत्यंत भरीव प्रगती केली. व त्याची लान्स नाईक ह्या पदावर नेमणूक झाली . मराठा लाईट इन्फन्ट्री मध्ये तो आता स्वतःच्या जलद प्रगतीने लान्स नाईक पदावर आला . अंगातील धडाडी वृत्ती .धाडस त्यामुळे त्याला सर्व गोष्टी सुलभ गेल्या . मग दोन वर्षाने १५ दिवसाच्या रजेवर तो विलासपूरला गावी परतला . गावी व घरी अत्यंत जोरात स्वागत झाले . आता सखाराम पाटलाला आनंद झाला होता . मुलाने खरोखरच भरीव सुधारणा करून दाखिवली होती . आठ दिवस बंडू गावात चोफेर फिरला . एकदा रंगनाथ पाटलाची हजेरी पण घेऊन आला , पण ... हा आनंद फार दिवस टिकला नाही.
नवव्या दिवशी घरी मिल्ट्रीचे अर्जेंट वॉरंट दाखल झाले. त्यामध्ये बंडूची पुढील रजा कॅन्सल झाली होती व त्याला ताबडतोब जम्मू -काश्मीरच्या बॉर्डरवर त्याच्या तुकडीत अर्जेंट सामील होण्यास सांगितले . बंडूला सखाराम पाटलांनी अत्यंत दुःखद अंतकरणाने निरोप दिला. प्रथम ते त्याला सोडत नव्हते तेव्हा त्याने सांगितले "काश्मीरमध्ये भारताची नियंत्रण रेषा ओलांडून आठ हजार कट्टर अतिरेकी घुसले आहेत व बहुतेक लवकर युद्ध पेटेल असे वाटते. निरपराध लोंकाची कत्तल हे अतिरेकी करीत आहे. आपली भारताची सीमा आता सुरक्षित ठेवणे हे आज प्रथम कर्तव्य आहे . " आणी .. मग बंडू पाटील तातडीने भारताच्या सीमा रेषेवर रवाना झाला .
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये युद्ध सुरु झाल्याच्या बातम्या आल्या आणि रेडिओ व दूरदर्शनवरून युद्धाची वर्णने येण्यास सुरुवात झाली . चार दिवस झाले .युद्ध आता जोरात उफाळले होते. बंडू पाटील लान्सनाईक असलेल्या मराठा लाईट इन्फेन्ट्री जोराने आगेकूच करीत होती . आता सिमारेषेवर भीषण धुमश्चक्री चालू झाली . विलासपूरच्या आसपासच्या गावातील सैन्यात भरती झालेले बरेच जवान मृत्युमुखी पडत होते . व त्या गावांवर शोककळा पसरत होती .
दुसऱ्या दिवशी बंडू पाटीलने सिमेवर अप्रतिम कामगिरी केली बंडूने जमिनीत पेरलेल्या सुरुंगाची पर्वा न करता अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे नाव सर्व वर्तमान पत्रात आले व बंडूच्या पराक्रमाची वर्णने रेडिओ व टीव्ही वरून सांगण्यात आली. आता सखाराम पाटलाच्या घरी गावातील लोकांची भेटी आणी गर्दी वाढू लागली . गावातील लहान थोर मंडळी सखाराम पाटलाला .धीर देऊ लागली .
... आणी मग एका रात्री रंगनाथ पाटील व श्रीपती पाटील हे बाप लेक दोघे पूर्वीचे सारे वैर दुशमनी विसरून सखाराम पाटलाकडे आली व आल्या आल्या रंगनाथ व श्रीपतीने सखाराम पाटलाचे पाय धरून माफी मागितली व सर्व जुने विसरून आता आपण एक आहोत याची ग्वाही देऊन दोघे त्वरित निघाले व भररात्री रंगनाथ पाटील व श्रीपतीने नोकरांच्या मदतीने दोघांच्या शेतावरील बांध जमीनदोस्त करून पाडून टाकला . आता दोघांच्या शेतजमिनी जणू एकच दिसत होत्या .
.. `तिकडे मराठा लाईट इन्फेन्ट्रीची आगेकूच चालूच होती आणी ..एक दुर्देवी क्षणी सैनिक आगेकूच करीत असताना जमिनीतील बॉम्बचा स्फोट होऊन लढता लढता आठ/नऊ सैनिक धारातीर्थी पडले. त्यामध्ये बंडू पाटील ह्यालापण वीरगती प्राप्त झाली .
सखाराम पाटलांवर जणू पहाडच कोसळला . मुंबईहून सदानंद व श्रीपती ह्यांनी लष्करी इतमानाने बंडूचा पार्थिवदेह विलासपूर गावात आणला . लष्करी इतमानाने बंडूवर अंत्यसंस्कार झाले . रंगनाथ पाटील व सखाराम पाटील ह्यांनी हंबरडा फोडला . दोघांच्या अश्रूंचा बांध फुटला .. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडले ,
त्यानंतर पंधरा दिवसांनी रंगनाथ पाटलांनी गावात सर्व लोंकाची सभा भरवली . त्यामध्ये वीरगती प्राप्त बंडूचे यथायोग्य स्मारक विलासपूर गावात निर्माण करण्याची घोषणा केली. मग गावच्या सरपंचानी विलासपूर गावच्या शाळेला बंडू पाटलांचे नाव देण्याचा सभेत संकल्प सोडला . त्याच बरोबर रंगनाथ पाटलांनी सखाराम पाटलाची जाहीर माफी मागून कोर्टातील केस मागे घेण्याची घोषणा केली .
इतका दिवस बंडूच्या मृत्यूने काळवंडलेला श्रीपती आज सभेत अंगात बळ संचारल्याप्रमाणे पुढे आला व त्याने भर सभेत रंगनाथ पाटलांना सांगितले "अण्णा मला आशीर्वाद द्या ही आपल्या भारत भूमीचे बांधावरची सिमेवरची लढाई आता मला लढायची आहे. मी आता सैन्यात भरती होणार आहे "
मग रंगनाथ पाटलांनी सर्व गावाच्या समक्ष श्रीपतीला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला..
धन्यवाद जय हिंद जय हिंद की सेना

Comments
Post a Comment