।।वास्तवातील स्वप्न लघु कथा - स्वप्नी जे पाहिले ते सत्यात अवतरेल कां ।।
।।श्री।।
।।वास्तवातील स्वप्न लघु कथा - स्वप्नी जे पाहिले ते सत्यात अवतरेल कां ।।
सदर हुन ही लघु कथा "दैनिक लोकमत " ह्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पेपर मध्ये "माझे स्वप्न " ह्या कॉलम मध्ये दिनांक -२५- ०२- २००२. साली छापून आलेली आहे .
'स्वप्न ' खरोखर स्वप्नासारखा सुंदर अनुभव देणारा .स्वप्न हा शब्दच जणू वास्तवातून स्वप्नाकडे घेऊन जातो. सुखाचा अनुभव देतो . प्रत्यक्ष्यात असे दिसते. की मनुष्याला त्याच्या वयानुसार . जगण्यातील अनुभवानुसार वेग वेगळी स्वप्न पडत असावीत त्यात पहाटेच्या प्रदूषणमुक्त वातावरणात पडलेली स्वप्ने खरी होतात असे ऐकलेले आहे .
... त्या दिवशी बारा डिसेम्बरला कामावरून पौंड रस्त्यावरून मोटार-सायकलने घरी निघालो. प्रकृती बरी नव्हती . घसा सुजून लाल झाला होता. त्यात डोकेही दुखत होते. डोळे चुरचुरत होते . -रस्त्यावरील वाहनांची प्रचंड गर्दी .हॉर्नचे कर्कश आवाज .सगळ्यांना घरी जायची घाई. प्रत्येक चौकात पडणारे ट्राफिक सिग्नल. अगदी जीव वैतागून गेला . मग उड्डाण पुलावर गाडी आल्यावर .सहज वरती आकाशात लक्ष गेले . संपूर्ण शहराभोवती काळ्या -तांबड्या धुरांचे प्रदूषणामुळे मोठे वलय निर्माण झाले होते . नंतर गडबडीत घरी जाता जाता डॉक्टरांकडे गेलो . डॉक्टरांनी घशात इन्फेकशन झाले असल्याचे सांगितले. मग इन्फेकशनच्या महाग गोळ्या विकत घेऊन निघालो , तर मध्येच पेट्रोल संपल्यामुळे गाडी बंद पडली . कसाबसा गाडी रेटत पेट्रोलपंपावर गेलो .बऱ्याच वेळ लाईन मध्ये उभा राहून पेट्रोल भरून घरी आलो. केवळ प्रदूषणामुळे आजारी पडण्याची माझी दोन महिन्यातील हि तिसरी वेळ होती. आजारी असल्यामुळे लगेच झोप लागली. साधारण पहाटे ४/५ च्या दरम्यान मला ते सुंदर स्वप्न पडलेवाहनातून ..... सकाळी स्वच्छ ऊन व चांगली हवा पडली आहे .मी माझ्या मोटर-सायकलने कामावर निघालो
रस्त्यांवर इतर वाहनांची गर्दी होती . नियंत्रित वेगात सर्व वाहने चालली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही वाहनातून म्हणजे मोठे ट्रक .टेम्पो. एस. टी .प्रवाशी बसेस. सिटीबस तीन आसनी व सहा आसनी रिक्षा .सर्व दुचाकी वाहने . ह्यांचा कुठलाही इंजिन वगैरे आवाज येत नव्हता , आणी ...विशेष म्हणजे कोणत्याही वाहनातून कुठल्याही प्रकारचा काळा -पांढरा धूर येत नव्हता , ज्याप्रमाणे वाहनाचे इंजिन चालू नसताना रस्त्याच्या उतारावरून गाडी जशी सुसाट पळते त्याप्रमाणे फक्त माझी गाडी सोडून इतर सर्व वाहने चालली होती . वातावरण कमालीचे शुद्ध .शांत व मोकळे होते . वातावरणात मोठे वाहनांचे कर्कश आवाज अजिबात नव्हते . विशेष म्हणजे ते प्रदूषणाचे बोर्ड कुठेच दिसत नव्हते . ...फक्त माझ्या एकट्याच्या वाहनातून पेट्रोलचा धूर व मोठ्या हॉर्नचा आवाज येत होता. मग कोपरावरील पोलिसाने शिट्टी मारून मला रस्त्याच्या बाजूला थांबवले व मला वाहनाच्या टाकीतले पूर्ण भरलेले पेट्रोल खाली रस्त्यावर ओतून देण्यास फर्मावले . व पोलीस कडक आवाजात म्हणाला "काय हो . पेट्रोल आणी डिझेलला सरकारने बंदी घातल्याचे तुम्हाला माहित नाही कां ? मी मुकाट्याने वाहनातले सर्व पेट्रोल रस्त्यावर ओतून दिले.त्याऐवजी आता या टाकीत काय भरावयाचे?
म्हणून समोरच्या पेट्रोल पंपावर गेलो . पण .. पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. त्या ओळखीच्या पेट्रोल पंपावर
'भोसले पेट्रोल पंप' ह्या नावाऐवजी नवा-' भोसले ड्रेस्टे ऑईल पंप 'असा हार घातलेला फलक दिसत होता . पंपावरच्या मुलाने पंपाचा खटका दाबून ते विचित्र ड्रेस्टे ऑईल मला २ लिटर घ्यायचे असतानासुद्धा चक्क १०
लिटर ड्रेस्टे ऑईल माझ्या गाडीच्या टाकीत ओतले . व मी काही बोलायच्या आत मला "साहेब २० रुपये द्या फक्त " असे सांगितले म्हणजे फक्त २ रुपये प्रति लिटर असा भाव त्या ऑईलचा होता. मग मी त्याला गाडीत
पेट्रोल भरल्यानंतर जे नेहेमीचे हायलुब -१००/१५० ग्राम टाकतात ते ते ऑइल टाकण्यास सांगितले . त्यावर तो पंपावरील मुलगा माझ्याकडे बघून सहानुभूतीने हसला व म्हणाला "साहेब हे ड्रेस्टे ऑईल म्हणजे सर्व गाड्यांचे अमृत आहे अमृत . अहो या ऑईलने उलट गाड्यांचे लाइफ वाढते, गाडीचा स्पीड एकदम केला . की गाडी बंद न होता इंजिनला ह्याचा सप्लाय बंद होतो व आपोआप सिग्नलला गाडी थांबते व ऎक्सेलेटर वाढवल्यावर गाडी पुन्हा पूर्ववत वेगात धावते . "
... मग कसल्यातरी जोराच्या आवाजाने माझी हि सुंदर झोप मोडली ,आणी माझे हे स्वप्नही भंग पावले .
मी घराच्या बाहेर आलो तर शेजारचा माणूस गाडी रिझर्व्ह ठेऊन ऎक्सेलेटर नुसता दाबून रेस करीत होता.
मी मोठ्या उत्सुक्तेने माझ्या गाडीची टाकी उतावीळपणे उघडली . ..न जाणो मला वाटले ते स्वप्नातील ड्रेस्टे ऑईल टाकीत असेल पण ... हाय झाकण उघडल्यावर तो पेट्रोलचा भपकारा नाकात शिरला ,मग मी पूर्णपणे जागा झालो . वास्तवात आलो . नाराज होऊन मनाशी विचार करू लागलो ,खरोखर पेट्रोल व डीझेल ह्या वाहनांच्या इंधनावर सर्व देशाची अर्थव्यवस्था चालत असते . हा खर्च जर कमी झाला तर. ?
'कोणा शास्त्रज्ञाला स्वप्नात दिसलेल्या सापाच्या वेटोळ्यातून दृष्टान्त मिळाला होता .
शेवटी स्वप्ने असतात म्हणून म्हणावयासे वाटते की -..
" वास्तवातील भान ठेवुनी -
भविष्यासाठी जगावे लागते ,
स्वप्ने प्रत्यक्ष्यात आणण्यासाठी
प्रयत्नांची शिकस्त करावी लागते . "
धन्यवाद जय हिंद

Comments
Post a Comment