||ऋणानुबंध ||
||ऋणानुबंध ||
सदरहून हि कथा शिवतेज ह्या दिवाळी अंकात २००० साली प्रसिद्ध झालेली आहे. प्रामाणिकपणे आपल्या गावाची सामाजिक सुधारणा व समाज एकीकरण्याच्या शुभ कार्यामध्ये अनेक अडचणी येत असतात . व ह्या सामाजिक कार्याचे स्वरूप राजकारणाकडे घेऊन जाते. व समाजसुधारणेचा हा पवित्र रस्ता राजकारणाच्या अनिष्ट मार्गाकडे जातो . ह्याचे प्रत्यन्तर ह्या कथेत आपल्याला दिसेल.
पहाटे साडेतीन च्या दरम्यान सदानंद पुन्हा पडले होते . विचारे दचकून उठला . आज पुन्हा तेच स्वप्न पुन्हा पडले होते. ... सदानंद रात्रीच्या गडद काळोखात चंदनपुरी गावच्या मोठ्या टेकडीवरील गणपतीच्या देवळात फक्त एकटा उभा आहे. मग देवळाच्या पायऱ्या चढून दुसरी आकृती पुढे येते. ती म्हणजे त्याचा जुना जिवलग मित्र विश्वनाथ घाटपांडे पुढे येऊन गणपतीच्या समोरील पणतीची वात पुढे करून देऊळ प्रकाशाने उजळतो .व म्हणतो 'अरे सदानंद बघ रे ह्या उंचावरून आपला गाव अंधारात नाहीसा होत आहे . गावाला प्रकाश दाखविला पाहिजे "असे म्हणून तो अंधारात नाहीसा होत आहे .
... अगदी हेच स्वप्न सदानंदला दोन महिन्यापूर्वी पडले होते . व ते स्वप्न तो विसरूनही गेला होता. चंदनपुर हे स्वतःचे गांव सोडून तो नोकरीसाठी खोपोली येथे आला होता व खोपोलीच्या मराठी शाळेत शिक्षक म्हणून महत्प्रयासाने दाखल झाला होता. स्वतःच्या हुशारीने त्याने तब्बल तेवीस वर्षे शिक्षण क्षेत्रात बरेच नाव कमावले होते. लहानपणापासून घडवलेला आई वडिलांचा संस्काराचा वारसा त्याने उजळला . शिक्षकाची नोकरी हा व्यवसाय नसून शिक्षण हे एक व्रत आहे. ह्या पवित्र भावनेने त्याने आपली कारकीर्द घडविली होती . आणी सदानंदने आदर्श शिक्षक म्हणून खोपोलीच्या शाळेत पुरस्कारही मिळवला होता .
तेवीस वर्षांपूर्वीचे चंदनपुर गाव आता जवळ जवळ १/२/महिन्यापर्यंत संपूर्ण विसरून गेला होता .
आपल्या नित्याच्या शाळेच्या व शिकवणीच्या रस्ता राम रगाड्यात तर त्याच्या लक्षातही येत नव्हते . पण .. २ वेळा पडलेले स्वप्न आज सदानंदास अस्वस्थ करून गेले. खरेच .. इतक्या वर्षाने आज पुन्हा हे स्वप्न का पडावे ?
मनाच्या अंतरंगात मग विलक्षण ढवळाढवळ झाली . सगळा भूतकाळ अगदी त्याला नको असतानाही पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर आला .
... त्यावेळी अगदी ऐन तरुणपणाचे कॉलेजचे ते दिवस केवळ हजारो आदर्शाने वेडे झालेले त्याचे तरुण मित्र .. केवढी रग .. केवढा उत्साह .. केवढे चैतन्य .. त्यावेळे चंदनपूरचा भोळा भाबडा साधा ग्रामीण चेहेरा असलेला तसाच अशिक्षितही . मग सदानंद विचारे .अनिल मोरे . विश्वनाथ घाटपांडे . ..आणि बरेच मित्र वर्ग ह्या सर्वानी आता केवळ गावासाठी झाटावयाचे ठरविले . होते ह्या सर्व कॉलेज मित्र मंडळ तरुणांनी श्रमदानाने व समस्त गावकऱ्यांच्या मदतीने फक्त केवळ एका महिन्यात चंदनपुर गावापासून पाच किलोमीटर रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडून दिला . केवढे प्रथमच सुंदर यश . यशाने ते भारावले . भावी संकटाच्या खाच खळग्यांचा त्यांनी विचारच नाही केला . वेगवेगळ्या जाती धर्माचे हे मित्र जात पात केवळ मनातही न ठेवता फक्त गावाच्या विकासासाठी आणि गावं म्हणजे स्वतःचे घरच आहे व ते कसे सुधारावे ह्याची आस सर्वे मित्रांना होती . एक गाव सुधारले म्हणजे एक हळू हळू राष्ट्र हि सुधारेल हि राष्ट्र नेत्यांची शिकवण त्यांनी आत्मसात करून हि शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले होते . मग त्यासाठी गावात वीज आणणे. पाणीपुरवठा योजना . साक्षरता मोहीम , शाळा .आरोग्य केंद्र दवाखाने . प्रौढशिक्षण . ग्रामीण कुटीरौद्योग मार्गदर्शन. इत्यादी अनेक योजनांची पायाभरणी झाली. हे सर्वे वृक्षारोपण तर केलेच . आता फक्त काळजीपूर्वक खतपाणी पाहिजे ह्या हेतूने मग विश्वनाथ घाटपांडेने गावात 'भेटवार्ता' नावाचे दैनिक वृत्तपत्र चालू केले . सुरुवात तर फार चांगली होती गावकऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. "चला पोरे काहीतरी ब्येस काम करत्यात आपल्या गावासाठी " हि गावकऱ्यांची भावना वाढीस लागत होती .
.. आणी मग गावाच्या विकासाच्या अश्याच एक धोक्याच्या वळणावर .. दौलतराव मानखांबे नावाचा विचित्र तरुण त्यांना सामील झाला . सुरुवातीला एक अनाथ . उपरा. आई बापाचा ठाव ठिकाण नसलेला तरुण म्हणून गावात एक प्रतिमा दौलतरावाने ठसविली . मग दौलतरावने सदानंद व विशवनाथशी घनिष्ठ मैत्री प्रस्थापित केली . स्थानिक तरुणांना तर आनंदच झाला. 'चला आपल्या गावच्या विकासाला आणखी लोकांची साथ मिळत्ये ह्या आनंदात सर्व जण होते.
पण सुरवातीच्या काळात दौलतराव त्यांना फक्त मदत करत असल्याचे नाटक करीत होता . पण त्याची चाल मात्र वेडीवाकडी होती. गोड गोड़ बोलून लोकांचा विश्वास संपादन करणे हि कला त्याला चांगलीच उपजत होती . गावच्या विकास कामासाठी तालुक्याच्या गावी खेटे घालणे . लोकांना पटविणे हि कामे तो भूल थापा मारून चांगली करत असे . गावात पुढील कार्य योजना काय असावी . ह्या संदर्भात चंदनपुर गावाच्या बाहेर टेकडीवरील गणपतीच्या मंदिरात सगळ्यांच्या बैठका व मिटींग्स होत असत ,
त्यानंतर दौलतरावाने एका मीटिंगमध्ये गावातील विकासासाठी गावकऱ्यांकडून काही तरी निधी म्हणून पैसे घेण्यास हरकत नसावी हा मुद्धा मीटिंगमध्ये उपस्थित केला. लोकांना आपण काय काम करतो ? ह्या कामांसाठी आपल्याला कितीत्रास होतो ? हे सर्व समजले पाहिजे. त्यासाठी आपल्या योजना लोकांना सांगून तेव्हा लोकांकडून काही रक्कम पैसे किंवा निधी म्हणून घायवयास हवी ती पण जरूर तेहवा सक्तीने . असा उपाय सुचवाला . दौलतरावाच्या ह्या मागणीचा विचार सदानंद व विश्वनाथला पटला नाही. कारण विना मोबदला घेऊन गावकऱ्यांचा विकास हा विश्वासाने गावातील झाला पाहिजे . तो सुद्धा गावकऱ्यांची मदत घेऊन केला पाहिजे .
त्यासाठी प्रथम त्यांना साक्षर करून विकासाचा अर्थ समजावणे . त्यांचे राहणीमान सुधारणे . आवश्यक आहे , सुरवातीलाच त्यांच्याकडून पैसा मागणे बरोबर नाही. प्रातां गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरवातीच्या काळात आपल्या सर्वे मित्रांना कठोर परिश्रम घयावे लागणार आहे . त्यासाठी थोडा कालावधी जाणार . एकदा आपल्या कामाबद्धल लोकांना चांगली समज आली कि मग पैश्याचा . वर्गणीची .निधीचा .विचार केला जाईल . आपल्या गावाचा विकास अजून बाल्यावस्थेत आहे . हे सर्व विश्वनाथ घाटपांडेने निक्षून सर्वाना मिटींगमध्ये सांगितले . त्यानंतर विश्वनाथ हि म्हणाला त्यासाठी मी गावात भेट वार्ता हे वृत्तपत्र चालू केले आहे . ह्या वृत्तपत्रात आपल्या गावच्या समस्या अडचणी ह्याविचार करून बरोबर गावातील इतर सुधारणा ह्यांना पेपेरमध्ये वाचा फोडत असतो . मग त्या मीटिंगमध्ये दौलतरावाला सगळ्यांनी खोडून काढले. " दौलतरावाने मनाशी विचार केला "साली हि मंडळी बरीच कट्टर आहेत " मग विचार करून दौलतरावाने बैठकीत सांगितले कि " बर गावात निदान जत्रा यात्रा तरी भरावी .किंवा एखादे सिनेमा थिएटर तरी पाहिजे तेवढीच गावाला करमणूक "हा विचार प्रथम सगळ्यांना विषयांतर वाटला . मग शेवटी सगळ्यांनी निदान गावात जत्रा भरावी हा मुद्धा मान्य झाला .
मग एकदा गावकऱ्यांची मीटिंग घेऊन गावात भैरवनाथाची जत्रा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यासाठी दौलतरावने पुढाकार घेतला. यात्रा अध्यक्षपदी दौलतरावची नेमणूक झाली . सदानंद व मित्रमंडळींनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. यात्रा वर्गणीच्या निमित्ताने दौलतरावने गावातल्या सर्वांशी संपर्क स्थापन केला . त्यामध्ये गावातील इतर तरुण वर्ग मोठया आनंदाने दौलतरावच्या गोड़ बोलण्याने त्याच्या मागे जमा झाला . त्यात त्याने गावच्यागावात प्रथमच ह्या तरुणांसाठी व्यायाम शाळा उभारण्याचे आश्वासन दिले. मग यात्रा दोन दिवसाची ठरली . व त्यामध्ये जवळपासच्या गावातील तमाशा व लोकनाट्यमंडळाना सुपाऱ्या गेल्या . मग एप्रिल महिन्यात २ दिवस यात्रा धुमधडाक्यात पार पडली . गावात प्रथमच ह्या निमित्ताने तमाशे मंडळे आली व नाच गाण्याच्या मैफलीची गावातील तरुणांना प्रथम ओळख झाली . व नवीन पर्वणीच मिळाली . मग जत्रा पार पडल्यावर आता दौलतरावाने गावातील हुल्लड तरुण वर्ग आपल्या मागे वळविण्यात यश मिळवले.
आता दौलतराव मीटिंगला येताना काही हुल्लड तरुणांना घेऊन येऊ लागला . व सदानंद आणि विश्वनाथशी हळू हळू शाब्दिक कुरबुरी करू लागला . कधी प्रत्यक्ष तर कधी हुल्लड तरुणांना मध्य घेऊन अप्रत्यक्षपणे कुरबुरी वाढतच होत्या . प्रथम दौलतरावचा खटका उडाला तो विश्वनाथ घाटपांडेशी आता प्रथम विश्वनाथाच्या लक्षात दौलतरावच्या चालीचा अंदाज आला . विश्वनाथने मीटिंगमध्ये त्याचा उच्चरही केला "गावातील तरुण मंडळींना हाताची धरून केवळ मजा मस्ती गुंडागर्दी करावयाची नाही . अशी ताकीद दिली . पण ह्या ताकिदीचा दौलतरावावर काही परिणाम झाला नाही .
त्यानंतर २-३ दिवस विश्वनाथ बाहेर गावी गेला . त्यानंतर पुन्हा गावच्या गणपती देवळात मीटिंग झाली . त्यावेळी नेमका दौलतराव मीटिंगला उपस्थित नव्हता . तो नाही हे पाहून विश्वनाथने गावातील तरुणांना असे निवेदन दिले की -' माझ्या वर्तमानपत्राच्या कामासाठी २ दिवस बरेच गावे फिरलो . मला एक महत्वाचे सांगावयाचे आहे कि आपण तरुण मंडळींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कि दौलतराव हा पुढाऱ्याच्या निर्लज्ज जातीचा आहे . व ह्या गावात उपरा व नवखा मुळीच नाही. मी तुम्हाला नक्की व खात्रीची बातमी देतो कि -दौलतराव मानखंबे हा आपल्या गावापासून ८० किलोमीटर लांब असलेल्या पिमल्गओनचा आहे. तो पिंपळगावचे माजी आमदार सर्जेराव मानखंबेचा सक्खा पुतण्या आहे. आपले राजकीय व पुढारीपणाचे करीअर घडविण्यासाठी तो आपल्या गावात्याच्या मृत्यूवर पडदा त दाखल झाला आहे. तेव्हा त्याच्यापासून सर्वानी सावध राहावे . व आपल्या गावच्या सुधारणा कार्यक्रम व विकास नियोजनाकडे सर्वानी लक्ष द्यावे ." असे निवेदन दिले.
त्यानंतर २/३ दिवसांनी परगावी गेलेला दौलतराव परत चंदनपूरला आला ते ओपन टुरिंग सिनेमाचे (तंबू टॉकीजचे ) परवाना घेऊनच व त्याच्या गावच्या मित्रांच्या मदतीने त्याने गावात सिनेमा थिएटर उभारले . मग गावातील सारा तरुण वर्ग दौलतरावच्या नादी लागला .
आणी त्यानंतर आठ दिवसाने भेटवर्ताचा संपादक विश्वनाथ घाटपांडे गावातून एकाएकी बेपत्ता झाला . त्यानंतर २/३/ दिवसांनी सदानंदला दुःखाचा धक्काच बसला . कारण विश्वनाथ घाटपांडे हा जिवलग मित्र गावाच्या बाहेर रानात मृत अवस्थेत सापडला . त्यानंतर काही दिवस पोलिसाच्या चौकशा चालल्या परंतु कुठलाही पुरावा ना मिळून विशवनाथचा अज्ञात मृत्यू म्हणून पडदा पडला . कारण कोणताही प्रथम दर्शनी पुरावा पोलिसाना मिळाला नाही कारण विश्वनाथ हा मृत्यूच्या अगोदर वृत्तपत्राच्या कामासाठी विश्वनाथ हा ८ दिवस गावाच्या बाहेर होता .
आता एका मागून एक धक्के सदानंद विचारेल बसू लागले. त्याच्या गावसुधारणा कार्यंक्रमातील दुसरा मित्र अनिल मोरेला घरातील मोठ्या जबाबदारीमुळे कुटुंबप्रमुख म्हणून नोकरीसाठी खोपोलीला निघून गेला . जाताना अनिल सदानंदला भेटला विश्वनाथाच्या अकाली मृत्यूमुळे व दौलतरावच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कारवायांमुळे दोघेही प्रचंड हादरले होते . चंदनपूर गावातील तरुण वर्ग हळू हळू आता संपूर्ण दौलतरावाच्या नादी लागला होता. जाताना अनिल मोरेने सदानंदला सल्ला दिला " बाबा सदा आता बस्स झाली कि समाजसेवा तू पण आता नोकरी धर कुठेतरी हे गावाची जनता मेंढराप्रमाणे असते नेहेमी चुकीच्या मार्गाने पुढे धावत असते . तुझ्यासाठी मी खोपोलीला नौकरी पाहतो' निरोप घेऊन अनिल मोरे गाव सोडून निघून गेला.
...आता गावात मुंबई सट्टाबाजार एकदा रातराणी मटक्याचे बोर्ड दिसू लागले . त्यानंतर सदानंदल तिसरा मोठा धक्का बसला. तो म्हणजे सदानंदाचा धाकटा भाऊ गणेश विचारे हा दौलतराव व त्याच्या सारख्या टोळक्याच्या पूर्ण कह्यात गेला होता . त्यांच्या नादी लागून रात्री अपरात्री येणे . तमाशा पाहणे .दारू पिणे .सिनेमा बघणे ह्यांचे गणेशाचे प्रमाण वाढत गेले. त्यात गावामध्ये सत्ता .जुगार . परमिटरूम ह्याचा सुकाळ झाला होता .दौलतराव व हुल्लड तरुणांच्या नादी लागून गणेश जुगार खेळू लागला . प्रसंगी घरातील पैसे .व किमती मूल्यवान वस्तू चोरू लागला. सदानंदच्या वडिलांनी मारहाण करूनही गणेशाचे वर्तन सुधारले नाही . घरातील वस्तू सट्टा . जुगार, आणी शौकासाठी गहाण ठेवून तो चंदनपुरी गावात दिवस जुगार व रात्री नाच गाणे तमाशाच्या बेठकीला हजर राहत असे . गणेश आता पूर्ण व्य गेला होता . सदानंद .घरचे व आसपासच्या लोकांनी समजावून सांगूनही काही उपयोग झाला नाही . गणेशच्या ह्या वर्तनामुळे हाय खाऊन सदानंदचे वडील आजारी पडले. सत्ता जुगार खेळण्यासाठी झालेल्या कर्जाने गणेशने एकदा गुपचूप घरातील घरमालकाचे कागदपत्रे हस्तगत केले व वडिलांच्या खोट्या सही व अंगठा करून उस्मान सावकाराकडे घर गहाण टाकले .
गणेशच्या गुंड मित्रांपुढे सदानंदची हि काही मात्र चालेना . कारण सदानंद एक तर सज्जन सरळमार्गी आणि दुसरे म्हणजे बरोबरीचे सर्व मित्र आता एक एक करून गाव सोडून गेले होते . त्यामुळे मानाने खच्ची होऊन सदानंद एकाकी पडला होता .
मग एका दुर्देवी दिवशी रात्री गणेश घरी नव्हता रात्री उशिरा पोलिसानी घराचा दरवाजा ठोठावला सदानंदने दार उघडले तो दारात पोलीस व हात पायात बेड्या घातलेला गणेश पोलीसांबरोबर उभा होता पोलिसानी सांगितले की " आम्ही गणेशला अटक करून घेऊन जात आहे त्याने तमाशातील नाचणाऱ्या तरुण मुलीशी अति प्रसंग केला आहे ." ह्या भानगडीत गणेश सापडला व त्याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली . नंतर ह्या प्रसंगाने संपूर्ण गावात सदानंदारावर दच्या कुटुंबाची बदनामी झाली . आता मात्र संदानंदच्या घरावर दुःखाचा पहाडच कोसळला . गणेशच्या तुरुंगवासाची बातमी ऐकून सदानंदचे वडील ह्या घटनेच्या धक्क्याने मरण पावले . नंतर १०/१२ दिवसाने गणेशने राहते घर गहाण टाकल्यामुळे उस्मान सावकार घराच्या जप्तीसाठी दाखल झाला. सदानंद व त्याच्या आईने विचार केला कि आता गावात राहून काही अर्थ नाही गणेशाचे त्यांनी संबंधच तॊडून टाकले होते .
एके दिवशी रात्री तुरुंगातील गणेशला न सांगता सदानंद व त्याच्या आईने सर्व जरुरी सामानासहित कायमचे चंदनपुरी राहते गाव सोडले. ते पुन्हा मागे वळून न बघण्यासाठी व न येण्यासाठी .
सदानंदाचा मित्र अनिलमोरेला हि सर्व सदानंदाची कर्मकहाणी काही दिवसातच समजली . त्याने त्वरित सदानंदला खोपोलीला बोलावले नंतर लगेच सदानंद खोपोलीच्या नवीन शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला व काही दिवसात खोपोलीला शिक्षक म्हणून स्थायिक पण झाला .
... हा संपूर्ण दीर्घ व कडू भूतकाळ सदानंदच्या नजरेसमोरून एखादा चित्रपटाप्रमाणे तरळून गेला. आता चंदनपुरी सोडून २३ वर्षे झाली तरी जुनी जखम असल्याप्रमाणे सदानंदला सर्व काही आठवले , ..आणि आठवून तरी क्या उपयोग ? गावाची नाळ स्वतःहून सदानंदने तोडली होती . दुसऱ्या दिवशी चहा घेताना सदानंदने आईला म्हणजे वत्सलाबाईंना आपल्या स्वप्नाची सर्व हकीकत सांगितली . त्यावर वत्सलाबाईने आईच्या मायेने गणेशाची आठवण काढली . मग सदानंद म्हणाला 'आई मला गणेशबद्धल काहीच वाटत नाही का ? मी गणेशचा २० वर्ष सतत तपास केला होता पण काही उपयोग झाला नाही तपास लागलं नाही ..
वत्सलाबाईंच्या डोळ्यातून गणेशच्या आठवणीने डोळ्यातून अश्रू -धारा वाहू लागल्या . ह्या वेळी मात्र सदानंद चक्क खोटे बोलला होता ' कारण गणेशबद्धल सदानंदच्या मनात प्रचंड संताप व राग होता . २३ वर्षे झाली तरी ह्या रंगाचा उद्रेक अजून विझला नव्हता . कारण सदानंदची सर्व ध्येय व आकांशा गणेशच्या बेताल वागण्यामुळे उध्वस्थ झाले होते . व त्या दौलतरावाच्या मार्गातील सदानंदची अडचण गणेशामुळे दूर झाली . दौलतरावच्या दलदलीमध्ये गाव पूर्ण फसलेला होता. समजा गणेशचा पत्ता काढून ना जाणो गणेश जर परत येथे येऊन टपकला तर? परत आणखी डोकेदुखी... नको जाऊ दे त्यानंतर ४/५ दिवस सदानंद नित्याच्या कामामध्ये परत पूर्ण बुडून गेला. ... परत मनामध्ये मात्र एक विचार येत असे खरंच आपण कठोरतेने गणेशावर बहिष्कार टाकला खरा पण त्याची साधी विचारपूसही इतक्या वर्षात आपण केली नाही . हि सततची काळजी पण सदानंदला सतावत होती. इतके वंश आपल्यासारख्या ने राग मनात धरावाचा त्यावर सदानंदचे दुसरे मान हि म्हणत होते की 'अरे वेड्या सदानंदा जिथे तू आपल्या गावाला व आपल्या भावाला गणेशला सुधारू शकला नाही तेव्हा प्रयत्न करून तुला हे कळले आहेच की "सुधारण्याचा काही उपयोग झाला का ? हे सर्व मनात विचारांचे युद्ध चालले होते .
मग त्या दिवशी रात्री सदानंदला झोपच लागली नाही . पण रात्री केव्हातरी डोळा लागला . झोपेमध्ये बरेच चित्र विचित्र स्वप्ने सदानंदला पडली . पण ... साधारणतः पहाटे पुन्हा तेच विचित्र स्वप्न सदानंदला पडले
" पुन्हा तेच चंदनपुरी गाव ...तेच ते गावाबाहेरच्या टेकडीवरील गणपतीचे मंदिर .. ह्यावेळी गणपतीच्या मंदिरात सदानंद एकटाच उभा आहे . ह्यावेळी मात्र गणपतीचे मंदिर गाभारा एका व पवित्र तेजाने अदभूत
तेजाने उजळला होता मंदिरात प्रखर प्रकाश होता व मंदिर सुशोभित वाटत होते . व सुंदर रांगोळ्यांनी सजले होते . आणि .. मंदिराच्या कोपऱ्यात एक अज्ञात सशक्त गोरापान तेजस्वी दाढीधारी तरुण उभा होता . आणी सदानंदला म्हणत होता "..दादा आशीर्वाद देता ना मला "...... आणी स्वप्न अचानक भंग पावले संपले .
सकाळी उठल्यावर सदानंदने त्वरित आईला हे स्वप्न कथन केले .त्यावर वत्सलाबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या "सदा लेका तू काही माझे ऐकत नाही बघ माझ्या गण्या बाळाचे पुढे काय झाले ? हे जरा रजा काढून चंदनपूरला जाऊन बघ कि अरे असा किती राग ठेवशील मनात अरे तुझा रक्तामासाचा भाऊ आहेत तो निदान तिथे जाऊन बघितले पाहिजे. ऋणानुबंध तोंडाने एवढे सोपे नसते. परिस्थिती आणि काळ सारखाच नसतो तो बदलत असतो. कदाचित गणेश सुधारला सुद्धा असेल आपण गाव सोडताना कोणालाही सांगितले नाही आणी कोणालाही आपला पत्ता दिला नव्हता .माझा गाणं लहानपणी असा नव्हता रे असे बरेच काही सदानंदची आई तळ तळून बोलत होती. बघता बघता सदानंदच्याही डोळ्यात पाणी आले . व सदानंद म्हणाला नाही आई मी चुकलो मला माफ कर मी इतक्या ताठ्यात व उध्वस्थ झाल्याचा दुखत होतो काळजी करू नको मी त्वरित १/२/दिवसात चंदनपूरला जाऊन जाईन "... असे बोलून सदानंद बेठकीच्या खोलीत गेला .रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती . सकाळी दारामध्ये ५/६ वर्तमानपत्रे व दैनिक पडले होते . शिक्षकी नोकरीने विविध वाचनाची आवड होती. मग सदानंदने पेपर घेऊन मुखपूष्ठ पहिले आणी .. एखादा विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे तो चमकला कारण बातमीचा अशी होती मग सदानंदने भराभरा सर्व वृत्तपत्रे उलगडून पहिली सगळे पेपर पाहून परत आश्चर्याचा धक्का बसला . चंदनगावाची विकास कार्यक्रमाची पूरवणी होती . व त्या पेपेरमध्ये राज्यपाल व मुखमंत्र्यांच्या उपस्थितीत आदर्श गाव पुरस्कार घेताना एका तरुणाचा फोटो होता . आणी .. तो तरुण दुसरा कुणी नसून पहाटे सदानंदने स्वप्नात पाहिलेला व त्याला सदानंदला आशीर्वाद मागणारा तरुण होता. सदानंद ऐक चित्ताने फोटोकडे बघत होता . ... पण छे ह्या तरुणाला कोठे पाहिल्याची ओळख सुद्धा पटत नव्हती. परंतु हाच तो स्वप्नातील दाढीधारी तरुण आहे ह्याची मात्र त्याला खात्री पटली . मग उत्सुकतेने सदानंदने फोटोखालील ओळी वाचल्या तेव्हा सदानंद आनंदाने अगदी थर थर कापू लागला . पपेरमध्ये फोटोखाली त्या तरुणाचे संपूर्ण नाव होते ' गणेश रामचंद्र विचारे ' . सदानंदने आनंदाने ओरडून आईला बोलावले .मग आईने धावत येऊन पेपेरमधली बातमी व फोटो पाहिले . क्षणभर वत्सलाबाईने निरखून पाहिले लगेच त्या म्हणाल्या 'अरे हा आपला गणेश दिसतोय. कपाळावर तीच ती लहानपणी खोक पडल्याची खूण होती. दोघांनी खुर्च्यांवर बसून सर्व बातम्या सविस्तर वाचल्या . त्यामध्ये गणेशने पुढाकार घेऊन कठोर मेहनत .व उत्कृष्ट प्रशासन त्याचबरोबर लोकसंघटन सहकार्यशक्तीने तब्बल वीस वर्ष कठोर परिश्रम केले . व आपण चंदनपूर गावाचा काया पालट पालट केल्याचे सांगितले . पपेरमधील आपल्या आत्मकथनात गणेशने कोणताही आडपडदा न ठेवता आपली कर्मकहाणी सत्यपणे सांगितली . " आपण २३ वर्षांपूर्वी पूर्ण वाया गेल्यानंतर त्यात तुरूंगातून सुटल्यावर आपल्यामुळे घरच्यांना जो त्रास झाला त्याच्या भरपाईसाठी प्रथम सावकाराकडून प्रथम राहते घर सोडवले . मग गावात त्याचे पूर्वीचे उडाणटप्पू टुक्कार तरुणांना परत एकत्र करून त्यांच्यात विधायक बदल घडवून गाव विकास सुधारणांचा सतत पाठपुरावा करून गाव विकासाला वाहून घेतले . त्याचा बरोबर त्याने आपले बंधू सदानंद विचारे . अनिलमोरे विश्वनाथ घाटपांडे ह्यांचा आदरपूर्वक कृतज्ञेतेने उल्लेख केला . आणी विशेष आवाहन म्हणून सदानंद व त्याच्या मित्रांना चंदनपुरी गावात येऊन गावाच्या विकासासाठी आशीर्वाद व मोलाचे मार्गदर्शन करण्याचे जाहीर आमंत्रण दिले.
वृत्तपत्रातील हे सर्व वाचल्यानंतर वत्सलाबाई व सदानंद अक्षरशः आनंदानी ढसा ढसा रडत होते स्वतःला सावरून सदानंदने त्वरित अनिल मोरेला फोने केला. अनिलनेही सर्व वर्तमानपत्रे वाचून समाधान व आनंद व्यक्त केला . मग दुसरेदिवशी सदानंद अनिलमोरे व आईसमवेत चंदनपूर गावी निघाला .
चंदनपुरी गाव आता आमूलाग्र बदलले होते. चंदनपूरचा सर्व चेहरा मोहरा बदलून एखाद्या तालुक्याच्या पूर्ण शहरी गावाप्रमाणे दिसत होता , गावाच्या वेशीवरच गणेश विचारे व समस्त गावकरी व गावातील तरुण वर्ग लेझीम .ढोल .ताशे .व बँड सहित सदानंदच्या स्वागतासाठी हजार होता . वेशीवर येताच क्षणी गणेशने धावत जाऊन सदानंद व आईस आनंदाने मिठी मारली सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूं धारा वाहू लागल्या वत्सलाबाईंना तर आनंदाचा उमासा फुटला . लाडका गणेश आता यशस्वी होऊन आपल्या घराण्याचे नाव प्रसिद्धीस आणले . मग गणेशने सगळ्यांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली . स्वतःच्या घरात गावी सदानंद आईसहित २२/२३ वर्षाने आला होता . गणेशने आपले घर चांगलेच सुधारले होते . घराच्या दारात गणेशच्या बायकोने पंचारती ओवाळून सर्वांचे स्वागत केले .
मग रात्री सगळ्यांच्या खूप गप्पा झाल्या . गणेशने मग भूतकाळातील सर्व इतिहास सांगितला "
सदानंदने लगेच गणेशाची माफी मागितली व सक्खा भाऊ असूनही तुझी चौकशीसुद्धा इतक्या वर्षात केली नसल्याचे दुःख व्यक्त केले . त्याला मध्येच थांबवून गणेश म्हणाला " नाही दादा विकासाचा मार्ग खूप काटेरी असतो एवढा सोपा नाही . त्याला त्यागाची खूप तयारी पाहिजे . निष्ठा हवी. प्रेम हवे . कि जे प्रेम संकटाची वादळे येऊनही नाहीसे होता कामा नये . त्यासाठी कठोर परिश्रम व प्राप्त परिस्थितीच्या परीक्षेची सुद्धा तयारी हवी तरच विकासाचे सुंदर ध्येय गाठता येते . नंतर गणेश सांगू लागला "दादा तुमच्या उद्वस्थ होण्यामुळे मी सावरलो. सहा महिने तुरुंगात शिक्षा भोगून नंतर ज्या तमाशातील तरुणीवर मी अतिप्रसंग केला म्हणून तुरुंगात गेलो त्याच तमाशातील तरुणीशी मी गावाच्या साक्षीने लग्न केले. आदर्शांची सुरवात मी माझ्यापासून केली . मग आम्ही दोघांनी मिळाले ते काबाडकष्ट करून प्रसंगी शेतमजुरी करून प्रथम सावकाराकडून आपले घर सोडवले व नंतर बाहेरून अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले . नंतर माझ्या सर्वे टुक्कार उडाणटप्पू मित्रांना गावाच्या भल्यासाठी एकत्र करून त्यांच्यात परिवर्तन केले .विकासाचा सर्वाना अर्थ समजावलं . आणी योगायोगाने आणखी एक घटना लगेच घडली विश्वनाथ घाटपांडे सरांच्या संशयास्पद मृत्यूसाठी सलग ३ दिवस पोलिसांनी दौलतरावची साधी चौकशी केली ह्या चौकशीने हादरून व दारूच्या नशेत मोटार सायकल चालवताना अपघातात दौलतराव मानखंबे मरण पावला . देवाने शिक्षा दिली . गाव ह्या दौलतरावच्या दलदलीतून सुटले . मग कंबर कसून सर्व तरुणांनी एक मोठे मित्रमंडळ स्थापन केले . तुमचे अर्धवट राहिलेले कार्य हाती घेऊन आदर्श गाव घडविले .
सदानंदने दिवाणखान्यात ठेवलेला स्वातंत्र सेनानींच्या फोटोकडे बघितले . फोटोमध्ये दिसणारा भारताचा तिरंगा ध्वज प्रथम केसरी रंग --म्हणजे क्रांती. बलिदान .-त्यानंतर येणार शुभ्र पांढरा रंग-म्हणजे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक .नंतर येणार हिरवा रंग म्हणजे -समृद्धी /विकास. शेतीची प्रगती. सुधारणांचे प्रतीक व महत्वाचे म्हणजे सर्वांचे मध्ये सतत पुढे धावणारे अव्याहत फिरणारे अशोक चक्र -अग्रमार्गाचे --सर्वात मध्ये तीन रंगांच्यामध्ये फिरणारे --अंधाराचा अर्थ व दुःख समजल्याशिवाय प्रकाशाचे व त्याच्या मांगल्यतेचे अनमोल मूल्य कळत नाही . समजत नाही .-आता मात्र सदानंदला आपल्या स्वप्नाचे त्यातील न तुटणाऱ्या ऋणानुबंधाचे - बरोबर उत्तर मिळाले .
धन्यवाद जय हिंद

Comments
Post a Comment