।।विड्यात रंगली रात्र ।। (रहस्यमय कथा )

                                                 ।।विड्यात रंगली रात्र ।।  (रहस्यमय कथा )
प्रस्तावना -सदरहून हि कथा "शिवतेज ह्या दिवाळी अंकामध्ये २००१ ह्या वर्षी प्रसिद्ध झाली आहे . ह्या कथेत मी .रहस्य कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . 

              ट्रिंग..ट्रिंग.. रात्रीचे तीन वाजता इन्स्पेक्टर दौलतराव मोकाशी ह्यांच्या घरातील फोन  वाजू लागला . नुकतेच रात्री अकरा वाजता माने वस्तीवरील दरोड्याचा तपास  करून येऊन झोपतो न झोपतो तोच रात्री ३ वाजता परत फोन , कशी बशी झोप आवरून . दौलतराव पोलीस चौकीवर हजर झाले. चौकीवर जाताच सर्व घटना समजली . तातडीने दौलतराव घटनास्थळी गुजरीबाई रहमान हिच्या कोठीवर गेले . तिथे विलासपूर गावातील नामवंत धनिक असामी धनाजीराव कर्दळे ह्यांचा खून झाला होता . रात्री साधारणतः एक वाजता धनाजीरावांचा नौकर विठोबा हा घाबरून ओरडत पोलीस चौकीवर आला होता. मग रीतसर केस नौदवून दौलतरावाने  डेड बॉडी पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिली . 

                       दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोलीस कमिशनर चौबळ  साहेबांचा फोन आला. चौबळांनी कडक शब्धात पाहिलांदा पोलीस बंदोबस्ताबद्दल विचारले. त्यानंतर त्यांनी सांगितले 'हे बघा दौलतराव विलासपूरमधील नामवंत धनाजीराव कर्दळे ह्यांचा खुनाचा तपास हि तुमची प्रमुख जबाबदारी आहे . धनाजीराव हे राज्याचे गृहमंत्री शिवाजीराव जगधने यांचे साडू होते  .ती दोघे एकाच राजकीय बैठकीतील होते  
तेव्हा आताच गृहमंत्र्यांचा मला फोन येऊन गेला. लागेल ती मदत घेऊन त्वरित तपास सुरु करा " फोन  बंद झाला. लगेचच इन्सपेक्टर दौलतराव तपासाच्या मोहिमेवर निघाले. 

                 इन्सपेक्टर दौलतराव हे कठोर.  करारी . प्रामाणिक व कार्यक्षम . पोलीस अधिकारी असल्याचा त्यांचा सर्वत्र नाव लौकिक प्रसिद्ध होता. त्यात नुकतीच विलासपूर ह्या तालुक्याच्या गावी त्यांची बदली झाली होती. खेदाची गोष्ट म्हणजे २/३/महिने विलासपूरला येऊन होतात न होतात तोच धनाजीराव ह्यांची खुनाची घटना घडली . त्यात आता धनाजीराव हे विलासपूर येथील भावी आमदार म्हणून ओळखले जात होते. त्यात परत गृहमंत्र्यांच्या बैंठकीतले .अशी परिस्थिती होती . 

               संध्याकाळी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला . त्यामध्ये धनाजीरावांचा मृत्यू हा पानाच्या विड्यातून विषबाधा घडल्याने झाला होता . विड्याच्या पानामध्ये जो कात टाकतात तसेच इतरही मसाला असतो . व कात हि जादा प्रमाणावर टाकलं होता. त्यामध्ये कुणीतरी काळ्या पालीचे विष मोठया प्रमाणात बेमालूमपणे मिसळले होते. शिवाय  धनाजीरावांनी दारूचे सेवन केल्यामुळे त्यात अल्कोहोलमुळे  विष  संपूर्ण शरीरात मिसळून त्यांचा मृत्यू झाला . रात्री एक वाजता धनाजीराव कोठीवरच्या तक्क्या व गादीवर मृत अवस्थेत होते.  त्याच्या आधी चार तास मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम मध्ये स्पष्ट केले होते . म्हणजे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला असावा . रात्री एक वाजता गुजरीबाईच्या कोठीवरचे गाणे बजावणे संपलेले होते. व नित्य नियमाप्रमाणे धनाजीरावांचा जुना नौकर विठोबा हा नशेत असलेल्या धनाजीरावांना घरी नेण्यासाठी येत असे . तसाच तो रात्री धनाजीरावांना घरी घेऊन जाण्यासाठी आला होता . धनाजीराव उठत नाही हे पाहून आरडाओरडा करून त्याने सर्वाना जमा केले . व रात्री एकनंतर धनाजीराव मृत घोषित होऊन पोलीस केस नोंदवण्यात आली . 

                      तपास चक्रे सुरू झाली दौलतरावाने प्रथम मयत धनाजीरावांनी माहिती जमा केली . विलासपूर गावात पूर्वी जेव्हा विलासपूर हे खेडेगांव  होते त्यावेळेपासून पन्नास-साठ वर्षांपासून कर्दळे परिवार अति श्रीमंत म्हणून ओळखला जातो . कर्दळेची २/३ सधन  मोठी घरे गावात आहेत . परंतु परस्परांशी त्यांचे कायम भांडण-तंटे इतर कटकटी जमिनीच्या वादावरून चालत असत. त्यात धनाजीरावांचा सख्खा भाऊ रंगोजी कर्दळे हा तर जणू त्यांचा हाडवैरीच होता . त्यांचे धनाजींशी शेत जमिनीसंदर्भात कायम वाद विवाद होत असत . त्यात गावात पूर्वी धनाजीरावाने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्याचा व फसविल्याचा गुप्ता प्रवाद . व चर्चा गावात होत होती पण उघड कुणी बोलत नव्हते कारण ह्या संदर्भात कुठलाही ठोस पुरावा नव्हता . 

                     धनाजीरावांच्या पंचक्रोशीत ३/४/ठिकाणी बागायती जमिनी होत्या स्वभाव रंगेल . गाणे बजावणे ऐकणे .त्यात दारूचा व विदेशी दारूचा नाद होता . त्यासाठी धनाजीराव विलासपूर मध्ये मुस्लिम कोठेवाली गुजरी बाई रेहमान व तिची मावशी रुक्सना बेगम ह्यांच्या कोठीवर गाणे बजावणे कव्वाल्या ऐकत असत . त्यामध्ये विलासपूरची सात/आठ धनिक मंडळीही होती. संध्याकाळी कोठीवर जाऊन रात्री एक नंतर धनाजी राव त्यांच्या बंगल्यावर येत असत . 

                    दौलतरावनी घटना घडली तो दिवस सात सप्टेंबर पासून या दिवसापासून घडामोडी तपासल्या . त्यासाठी त्यांनी स्थानिक पोलीस हवालदार ह्याला बरोबर घेतले. त्या दिवशी सात सप्टेंबरला  बऱ्याच खळबळजनक घटना घडलेल्या होत्या . सखोल तपासाअंती असे कळले की -' धनाजीरावांची सकाळी उठल्यापासून बऱ्याच लोकांशी भांडणे झाली होती. प्रथम त्यांची सुशील व गरीब स्वभावाची पत्नी अनुसयाबाईशी  भांडण झाले .  घरात अनुसयाबाईंचा धाकटा भाऊ संजय हा नुकताच बी . ऐ . पास होऊन नोकरी व धंदा ह्याविषयी धनाजीरावांच्या ओळखीने कुठे जमतंय काय ? ह्यासाठी २/३/महिनांपासून मुक्कामाला होता . तो रिकामाच आहे आहे म्हणून धनाजीरावनी संजयला शिवराळ भाषेत आपल्या  ड्रेसला बाहेरून कडक इस्त्री करून आणण्यास सांगितले . त्यावरून आपल्या भावाला अशी कामे का सांगता म्हणून अनुसयाबाई व धनाजीराव यांच्यामध्ये मोठा वाद-विवाद झाला. त्यावेळी घरातील जुना नौकर बाहेर गेला होता . त्यात पत्नी अनुसयाबाई बद्धल जुना राग होता .तो म्हणजे धनाजीरावला  त्यांच्या लग्नात अनुसयाबाईच्या माहेरून घरून म्हणावा तसा पाहिजे तसा हुंडा. पैसा व मान पान झाला नव्हता . त्यामुळे सुशील व गरीब अनुसयाबाईचा अपमान व मानसिक छळ धनाजीराव वेळो वेळी करीत असत . त्यांची भांडणे चालू असतानाच नौकर विठोबा आला . त्याला धनाजीरावने  रागाने प्रचंड शिवीगाळ केली फक्त हंटरने माराव्याचे बाकी ठेवले . विठोबाने नेहेमीच्या सवयीप्रमाणे खाली मान घालून सर्व ऐकून घेतले . 
      नंतर मग अगदी त्याच वेळी नेमका रात्रीपासून मित्रमंडळींच्या पार्टीला गेलेला धनाजीरावचा सुपुत्र विकास उगवला .त्याला मात्र धनाजीरावांनी खाडकन मुस्काटात मारली . व ओरडले "हरामखोर बापाचा पैसा उडवायला तुला वेळ आहे होय .? तिकडे शेती वाडी उद्योगाचे कोण बघणार ? त्यावर विकास उद्धटपणे म्हणाला " वा रे वा तुम्हाला तिकडे गुजरीबाईच्या माडीवर जाऊन गाणी बजावणी ऐकायला वेळ हाय आन मला शेतीवाडीचे काम सांगतात होय . " हे उद्गार ऐकून धनाजीराव परत विकासाला मारण्यासाठी धावले .  तेवढ्यात नेमका फोन  वाजू लागला. त्या रागाच्या भरात धनाजीरावने  फोन घेतला . तिकडून फोनवर शेतावरील नोकराने शेतीवर धनाजीरावांचा चुलत भाऊ रांगोजीने काहीतरी भानगड केल्याचे सांगितले . त्याला मग फोनवर शिवीगाळ करून तावातावाने धनाजीराव स्वतःच्या गाडीने दुपारी बारा वाजता घराच्या बाहेर पडले . 

                  त्यादिवशी धनाजीराव संध्याकाळी रेलॅक्स हॉटेलमध्ये भरपूर दारू प्याले . व तसेच गाणे ऐकण्यासाठी गुजरीबाईच्या कोठीवर गेले, नेमका तिथे प्रकाश विप्रंदास नावाचा तरुण गुजरीबाईशी गप्पा मारत असताना धनाजीरावला दिसला . त्याचाशी पण धनाजीरावांचा वाद-विवाद झाला. कारण प्रकाश विप्रंदास हा गुजरीबाईचा प्रियकर होता . व विलासपूरच्या गैरेज मध्ये काम करीत असे .त्याचे हे संबंध धनाजीरावलं खटकत असत त्यावेळी " मी पण बघून घेईल अशी धनाजीरावला धमकी देऊन प्रकाश तेथून निघून गेला ,
       मग  गुजरी बाईचा  दिल मुजरा डान्स चालू असताना नेमका रंगोजी कर्दळे तेथे आला . ते दोघे हि नशेत असल्यामुळे रंगोजी व धनाजीराव ह्यांची परत जमिनीच्या वादावरून भांडणे सुरु झाली . त्यावेळी रात्रीचे साडेआठ वाजले होते . रात्री साडेआठ वाजले होते. रात्री  साडेआठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत धनाजीरावांना विषारी विडा देण्यात येऊन नंतर धनाजीराव बेहोषीत पडले व त्यांचा मृत्यू झाला. ह्याप्रमाणे केस रिपोर्ट फाईल दौलतरावांनी तयार केली .  तितक्यात फोन वाजला -तिकडून पोलीस कमिश्नर चौबळ ह्यांनी 'धनाजीरावच्या
केस ची काय प्रगती आहे . ताबडतोब गुन्हेगाराला शोधून काढा .आत्ताच गृहमंत्रांचा फोन येऊन गेला. त्यात परत सात आठ पत्रकारांनी मंडळीने सुद्धा चौकशी चालवली आहे . तुम्हाला तर माहित आहे की विलासपुरात धनाजीराव भावी आमदार म्हणून ओळखत होते. तर काही पोलीस मदत हवी असेल तर सांगा व लगेच मला रिपोर्ट करत चला "फोनवर चौबलसाहेबाना मोजकी उत्तरे देऊन दौलतरावांनी फोन  ठेवला . आता मात्र दौलतरावना जबरदस्त मानसिक दबाव जाणवू लागला .   

         दुसरे दिवशी अशोक कदमांना घेऊन दौलतरावाने घटनेसंदर्भात महत्वाच्या जबान्या घेण्याचे काम चालू केले . प्रथम नौकर विठोबास बोलावले. विठोबाने सांगितलेतेव्हा धनाजी  कि "साहेब मी वीस वर्षांपासून धनाजीरावकडे काम करतो साहेबाना फक्त संध्यकाळी सातच्याला एकदा आन रात्री एक वाजता घरी नेण्यासाठी कोठीवर जातो , 
व त्याना नशेत असल्यामुळे घरी घेऊन येतो. त्या दिवशी मी रात्री गेलो तेव्हा धनाजी साहेब गादीवर बेहोष पडले होते . उठत नाही म्हणून आरडाओरडा करून सर्व लोकांना जमवले व मी पोलिसात तक्रार दिली . हे सर्व दौलतरावने लिहून घेतले . नंतर गुजरी बाई कोठीवाली व तिच्या मावशीची जबानी घेतली . सुस्वरूप व निष्पाप  दिसण्याऱ्या गुजरी बाईने न भिता सत्य माहिती सांगितली . धनाजीराव नशेत गाणी बजावणी ऐकण्यासाठी येत असत . साधारणतः कोठीवर गावातील आठ/नऊ सधन लोकं येत असतात . मी कोठीवर रात्री आमच्या पानाच्या तबकातून पहिली डून/तीन गाणी झाल्यावर रात्री नऊनंतर पानाचे विडे दित असते . कोठीवर येणाऱ्या ८/९ धनिक लोकांमध्ये धनाजीराव व रांगोजी कर्दळे हे सुद्धा होते . त्यात सात सप्टेंबरला शुक्रवार असल्यामुळे नमाज पदन्यास मी व माझी मावशी रात्रीच जात असतो . दोघी रात्री साडेआठनंतर निघालो . त्यावेळी धनाजी साहेब व त्यांचा भाऊ रंगोजी ह्यांची भांडणे चालली होती . त्यांना आम्ही मशिदीत नमाज पढून येतो असे सांगितले . आम्ही नमाज पढून आल्यानंतर आम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यावेळी नेहेमीची सात/आठ माणसे कोठीवर होती . आम्ही मैफल चालू केली तेव्हा  रंगोजी कर्दळे हाजीर होते. पण धनाजी साब गाडी व लोडावर बेहोष पडलेले होते . मग मैने सबको तबकमेसे पान दिया.सिर्फ धनाजी साबको ऊस रात मैने पान नही दिया . वे बेहोष होकार गादी पर पडे हुवे थे.  रंगोजी साब को भी मैने पान दिया. मगर बाकी सब लोगोपर पान का असर नही हुवा . बाद मे मैने भी पान खाया .मै पहिले हि शामको हि पान के विडा बनाकर मेरे अलमारी मे राखता हू . और मेरी मौसी मैफल चालू होनेके बाद बीचमे करीब साडेनऊ बजे पान का तबक मेरेको देती है . ऊस रात मैफल मै भारी मजा आ गया.    मैफल बहोत रंग लाई . क्योकी नाचणे और गानेकी रुकार किसीने भी नाही डाली . सिर्फ धनाजी साब रुकार डालते थे . और दुसरे गानेकी फर्माईश देनेकी उनकी आदत थी . मगर बेहोष  होनेके बावजुद दुसरे और किसीनेही रुकार नही डाली . हमने इसलिये बेहोष धनाजी साब पर दुर्लक्ष किया . न  जाणे शराब जाडा होकर वे गिरे होंगे ऐसा हम सबने सोचा .   याप्रमाणे गुजरीबाईची हिंदी -मराठी जबानी दौलतरावाने नोंदवून घेतली ,

           व   नंतर रंगोजी कर्दळेला जबानीसाठी बोलावले .झाल्या प्रकाराने रंगोजी पण मनापासून हादरला होता. आपल्या जबानीत तो म्हणाला " हे बघा साहेब धनाजी  हा कितीही झाले तरी माझा भाऊच होता . आमच्या घराण्याची भांडणे बऱ्याच वर्षांपासून चालू आहेत . पण आम्ही एक दुसरे असा प्रकार कधी केला नाही . मला जर धनाजीला मारावाचे असते तर तर मी ह्या अगोदर कुठेही मारले असते . मी त्यादिवशी  दोन वेळा भांडलो हि गोष्ट  खरी आहे . पण कुणीतरी त्याला त्या दिवशी विषारी विडा दिला हे मला माहित नाही . आम्ही भांडत असताना तिथून नमाजासाठी गुजरीबाई व तिची मावशी बाहेर पडल्या. तेवढ्यात माझा नौकर हरी जमदाडे तेथे आला व त्याने भांडण मारामारीपर्यंत जाऊ नये म्हणून माडीवरून मला डोके शांत करण्यासाठी घेऊन गेला . मग रेलॅक्सव हॉटेलमध्ये मी परत एक दारूचा पेग घेतला . तेवढ्या अवधीत धनाजीला कुणी तरी तो विषारी विडा दिला असला पाहिजे . कारण मी परत रात्री साडेनऊच्या आसपास कोठीवर आलो . तेव्हा मैफल चालू झाली होती . मग गुजरी बाईने आम्हा सगळ्यांना तबकातून पानाचे विडे दिले होते . पण आम्हाला काहीच झाले नाही . त्यावेळी धनाजी गादीवर बेहोष पडला होता . दारू पिऊन नशेत असेल म्हणून कुणी त्याच्याकडे लक्ष दिले नाही . मैफल रंगात आली पण मला ब्लड प्रेशर चा त्रास असल्यामुळे मी कधीच जास्त जागरण करीत नाही . म्हणून घरच्यांनी माझा विश्वासू नौकर हरी जामदाडेला माझ्याबरोबर ठेवले आहे . मग मी रात्री अकरा वाजताच कोठी वरून मैफल सोडून निघालो . तेव्हा धनाजीराव बेहोशीतच होता . " मध्येच दौलतरावाने विचारले-"तुमची भांडणे चालू असताना कोठीवर आणखी कोण कोण व्यक्ती होत्या ?- त्याला उत्तर म्हणून रंगोजी म्हणाला -"साहेब थोडा वेळ गुजरीबाई व तिची मौसी होती नंतर आमच्या दोघांशिवाय कुणीच नव्हते . त्यानंतर माझा नौकर मला तेथून घेऊन गेल्यावर धनाजीराव कोठीव एकटाच होता . ह्याप्रमाणे रंगोजीची जबानी  नोंदवली गेली . 
    
              दुसरे दिवशी तपासाला पाठवलेला हवालदार अशोक कदम दौलतरावांकडे आला व म्हणाला " साहेब गुजरीबाई व रंगोजी ह्यांच्या जबानीची शहानिशा तपासाने मी केलेली आहे . त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुजरी बाई व तिची मावशी रात्री नऊच्या आसपास मशिदीत नमाजासाठी गेल्या होत्या . रंगोजी कर्दळे हा सुद्धा रात्री नऊ वाजता रेलॅक्सव हॉटेलमध्ये त्याचा नौकर हरी जमदाडे बरोबर होता , .नंतर कोठीजवळील उस्मान पानवाला गुजरी बाईच्या कोठीवर विड्याची पाने पुरवीत असतो . त्यानंतर गुजरी बाईचा प्रियकर प्रकाश विप्रंदास हा त्या दिवशी जादा काम असल्यामुळे गॅरेज मध्येच काम करीत होता . सध्या धनाजीरावांच्या बंगल्यावर  लक्ष वॉच ठेवला आहे त्यावेळी तपासानंतर सात सप्टेंबरला अनुसयाबाई .त्यांचा भाऊ संजय .व मुलगा हे संध्याकाळ नंतर कोठेहीबाहेर गेलेले नव्हते . एवढी महत्वपूर्ण बातमी दिल्यावर नंतर न राहवून अशोक कदम एकदम हसला . तो हसल्याचे पाहून दौलतराव भडकले व म्हणाले " असा काय हसतो आहे मूर्खासारखं ते .इथे एकतर खुनाचा तपास लागत नाही शिवाय वरून माझ्यावर साहेबांचे व राजकीय दडपण आहे . " त्याना मध्येच थांबवून अशोक कदम गंभीर पणे  म्हणाला "नाही साहेब ऐकून घ्या हसण्यासारखाच प्रकार घडला आहे .   मी विलासपूरमध्ये काल तपस करीत असताना मला भगवान मोरे हा गावातील बेवडा तरुण भेटला . कायम संध्याकाळनंतर दारूच्या नशेत असतो व रात्री मोठं मोठयाने गाणी बडबड करीत घरी जात असतो. त्या दिवशी सात सप्टेंबरला रात्री पैसा खिशात नसल्यामुळे उधारीची दारू पिऊन कोठीवर गेला . पण गाणे ऐकायला खिशात पैसाच नसल्याने त्याला कोठीवर कुणी प्रवेश दिला नाही . पण नशेत त्याने खालीच कोठीच्या खांबाला टेकून बसून राहिला . व त्या रात्री कोठीच्या खाली नुसती गाणी बजावणी ऐकत होता . मग दौलतराव रागाने म्हणाले -"बरे पाल्हाळ पुरे -पुढे काय ते सांग -"  त्यावर अशोक कदम म्हणाला "साहेब तो भगवान मोरे म्हणतो मी गुजरी बाईला रात्री पहिले डोक्यावरून पांढरा दुपट्टा पांघरून गुजरीबाई रात्री साडेआठ नंतर बाहेर पडली. इच्या बरोबर तिची मौसी होती . नंतर रंगोजी बाहेर पडला व.. पाच मिनिटाने डोक्यावरून पांढरा दुपट्टा पांघरून गुजरीबाई दबकत दबकत वरती माडीवर गेली . व पाचच मिनिटाने भरभर जिने उतरून खाली येऊन समोरच्या मागच्या गल्लीत दिसेनाशी झाली . त्यानंतर वीस मिनिटाने परत नऊ वाजून पाच मिनिटाने गुजरी बाई व मौसी नेहेमीप्रमाणे वरती गेल्या . हे सर्व ऐकून दौलतरावाने आनंद झाला . ताडकन उभे राहून ते म्हणाले " अरे हि तर महत्वाची बातमी दिलीस तू " म्हणजे धनाजीरावांना कुणीतरी बाईचं पानाचा विडा दिला. तो तबकातून न देता हाताने दिला गेला. व नंतर त्यांचा काटा काढला . मध्येच अशोक कदम म्हणाला "साहेब भगवान मोरे एक नंबर बेवडा त्याच्यावर आपण का विश्वास ठेवावा ?. त्याला थांबवून दौलतराव म्हणाले "अरे त्या दिवशी ७ तारखेला तो दारूच्या नशेत होता. काल तुझ्याशी बोलताना भर दिवस तो नशेत नव्हता हे लक्षात ठेव . हा फार मोठा क्लू आहे ."

                        दौलतरावाने नंतर विचारले " धनाजीरावच्या घराची तू पाळत ठेवून माहिती काढली आहेस तर अनुसयाबाईवतरिक्त आणखी कोणी बाई माणूस आहे कां ? त्यावर हवालदार अशोक कदम म्हणाला "साहेब धनाजीरावांच्या पत्नी अनुसयाबाई ह्या खानदानी आहेत. संध्यकाळपर्यंत त्या बाहेर पडत नाही .घरातच त्या देवकार्य करीत असतात , हा.. पूर्वी मात्र नौकर विठोबाची दुसरी बायको सखुबाई हि तरुण स्त्री  मोलकरीण म्हणून  होती. ती धनाजीरावच्या बंगल्यावर येत असे . परंतु वीस दिवसांपासून ती धनाजीरावच्या बंगल्यावर कामाला येत नाही . विठोबा मात्र न चुकता विलासपूर जवळील ५ किलोमीटर अंतरा वरून अंगणगावावरून घरून साइकलावरून येतो . दर २/३/दिवसाने साइकलवरून घरी जात असतो . " हे सर्व अशोक कदम चे बोलणे ऐकून दौलतरावांची बुद्धी काम करू लागली . 

                                त्यानंतरचे काही दिवस दौलतरावाने आणखी टप्पास केला . त्यात सात सप्टेंबरला कोठीवर हजर असलेल्या काही लोकांच्याकडे चौकश्या केल्या . कोठीच्या खाली असलेला फुलवला अब्बास तांबोळीला पण काही प्रश्ने विचारली . परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. परंतु त्याने दौलतरावाने विचारले असता सांगितले कि रात्री धनाजीरावांचा नौकर विठोबा हा थोडा वेळ रात्री साडेआठनंतर समोरच्या गल्लीत अंधारात उभा होता . व नंतर ५ ते १० मिनिटाने भरभर चालत निघून गेला. आणी परत रात्री एकच्या पुढे नेहेमीसारखा धनाजीरावला घ्यायला आला " तांबोळीची जबानी ऐकून दौलतराव विचार करू लागले . हा विठोबा फक्त रात्री एक वाजता धनाजीरावांना घ्यावयास येतो मग त्या दिवशी रात्री साडेआठ वाजता  कोठीच्या आसपास कां घुटमळत होता ?. झाले दौलतरावाने विचार केला .. व दुसऱ्या दिवशी तडक धनाजीरावांच्या बंगल्यावर जीप व एक हवालदार व अशोक कदमला घेऊन निघाले . बंगल्यावर त्यांनी डायरेक्ट विठोबा कुठे आहे म्हणून विचारले ? तेव्हा तो गावी गेल्याचे सांगण्यात आले. कारण सात सेप्टेंबरपासून आज सात ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महिना दौलतरावाने ह्या  प्रकरणाचा कसून तपास केला होता, त्यात महत्वाचे म्हणजे आज सात ऑक्टोबरला धनाजीराव कर्दळे ह्यांचे मासिक श्राध्द आहे. त्यात विठोबा हा जुना व विश्वासू नौकर असताना नेमका आज सकाळचे दहा वाजले तरी त्याचा इथे पत्ता नाही ? मग धनाजीरावच्या बंगल्यावरून तडक जीप घेऊन विठोबाच्या गावी अंगण गाव येथे तडक विठोबाच्या घरासमोर हजर झाले . 

                   त्यावेळी विठोबा व त्याची तरुण बायको सखुबाई घराच्या अंगणात बाज विणत बसले होते . दौलतराव व हवालदार अशोक कदमला बघून विठोबा व सखुबाई ह्यांच्या चेहेऱ्यावर एकदम  भीती दिसली . 
ती भीती चाणाक्ष दौलतरावाच्या नजरेतून सुटली नाही . सावकाश जीप मधून उतरून दौलतराव विठोबाकडे चालत येत असल्याचे पाहून विठोबा तात्काळ उतरला " साहेब आमच्या धनाजीरावांच्या बद्धल सर्व माहिती तुम्हाला दिली आहे कि ? त्यावर दौलतराव शांतपणे   म्हणाले " अरे काय हे मी आत्ताशी तर येतो आहे तुला आम्ही काही विचारण्याआधी कसे बोलतो तू ? .. आणि कायरे .. आज तुझ्या मालकाचे मासिक श्राध्द आहे. आणी तू इथे बसून खुशाल निवांत बाज विणत बसला आहेस ते ? 

            आता मात्र विठोबा व त्याची बायको थर थर कापू लागले , ते पाहून दौलतरावाने झटकन विठोबाच्या मुस्काटात ठेवून दिली .व जोरात कडाडले " हरामखोरा खरं खरं सांग काय ते " हा पोलीस हिसका पाहून विठोबा मनात समजून चुकला आता काही खरं नाही ते मग ओक्सबोकसी रडू लागला . व म्हणू लागला " साहेब आम्ही गरीब माणसे जवा सगळं असह्य होते सहनशक्तीच्या पल्याड जाते तवा असे कृत्य करण्यावाचून आमास्नी 
काही इलाज  गत्यतर राहत नाही. 

              मग विठोबाने सगळी हकीकत सांगितली . " मी २० वर्षांपासून धनाजीरावांकडे घरगडी म्हणून काम करतो पण त्या नालायक धनाजीरावाने माझ्या बापजाद्यांच्या जमिनी कारस्थाने गुंडगिरी करून आपल्या नावावर करून घेतल्या . मग मी गरिबीमुळे तसे काही न दाखवता घरगडी म्हणून त्यांच्याकडे नौकरी धरली . 
माझे दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले . पहिली बायको मुलंबाळं न होता दम्याचे औषधउपचार न झाल्याने गेली. नंतर आम्ही दोघेही धनाजीरावांकडे कामाला लागलो . पण वाईट नजरेच्या धनाजीरावने माझ्या तरुण बायकोवर मागच्या ऑगस्ट महिन्यात तीन वेळा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न  केला. नशिबाने मी धावल्यामुळे ती सुटली. मग एके दिवशी २७ ऑगस्टला दारूच्या नशेत तडक धनाजीरावणे माझ्या बायकोची मागणी केली . 
व नाही तर तुला नौकरीवरून काढून टाकतो. असे धमकावले मग मात्र माझ्या रागाचा पारा चढला . त्या दिवशी रागारागात मी घरी आलो . तेव्हा घराच्या भीतीवर मला काळी पाल दिसली . त्या पालीला मारून तिचा चुरा केला व वाळवून जालीम विष तयार केले . नंतर ते पानाच्या कातात मोठ्या प्रमाणात मिसळून पानाचा विडा तयार केला . धनाजीरावाला  बनारस विड्याचे पण खाण्याचा शोक होता . तो दोंष व शोक मी बरोबर हेरला .चांगल्या बनारस  पानाचा विडा तयार केला . धनाजीराव गुजरी बाईच्या माडीवर पण खात्यात हे मला माहित होते . मग त्या दिवशी रात्री मी सखूबाईला घेऊन मांडीच्या जवळ अंधारात दाब धरून बसलो . त्यात मी रात्री एक वाजता धनाजीरावाला आणण्यासाठी जात असतो . त्यामुळे गुजरीबाई व मावशी नमाजाची शुक्रवारी जात असतात हे मला माहित होते . मी सखुबाईला मोठा पंधरा दुपट्टा आणून दिला . गुजरीबाई जेव्हा तिच्या मावशीबरोबर मशिदीत गेली तेव्हा काही वेळाने रंगोजी कर्दळे पण बाहेर पडला . हा मोका साधून धनाजीराव गादीवर बसलेले पाहून मी सखींबाईला गुजरीबाईच्या पद्धतीने मोठा पंधरा दुपट्टा डोक्यावरून व चेहेऱ्यावरून झाकेल अशा ओढणीच्या पद्धतीने घेऊन माडीवर पाठविले . व सखूने माडीवर जाऊन पटकन तो विषारी विडा धनाजीरावलं खायला घातला . नुकतेच रंगोजींशी भांडण झाल्यामुळे व नशेत  असल्यामुळे धनाजीरावाने तो पटकन खाऊन टाकला . .... अन आमचा कार्यभाग साधला गेला . मग विठोबा गप्प झाला व रडू लागला . 

                        दौलतरावाने सर्व जबाब नोंदवून घेण्यास सांगितले . व समाधानाचा सुस्कारा सोडून विठोबा व सखू बाई ह्या दोघांना बेड्या घालून अटक केली . व पोलीस चौकीत घेऊन गेले ... 



धन्यवाद        
      


            
   

  
    













Comments