त्या जागी मी असतो तर (नर्म विनोदी कथा )
त्या जागी मी असतो तर (नर्म विनोदी कथा )
मनोगत -: साप्ताहिक गगनझेप १९९९ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली हि कथा आहे . ह्या कथेत मी विनोदी लिहिण्याच्या प्रयत्न केलेला आहे. साधारणतः ह्या दुनियेत मानवाच्या चित्र विचित्र समुदायात आपल्यलाला अनेक माणसे भेटतात त्यामध्ये अनेक प्रकारचे नमुनेदार माणसे असतात . त्यात सर्वात स्वतःला काही तरी वेगळे व आपण इतरांपेक्षा किती वेगळे व सुपरमॅन आहोत हे दाखवणाचा काही विचित्र माणसे प्रयत्न करीत असतात अश्याच एका विचित्र माणसाची कथा इथे देत आहे ...
जगन्नाथ आगळंबे त्याच्या नावाप्रमाणे विचित्र असलेली वल्ली . आपल्या नावातील जगाची उठाठेव करून त्यानुसार हिरोगिरी करणे हा त्याचा व्यवसाय . गिरगावातील आमच्या तात्या टंकलेच्या जुन्या चाळीत ठामपणे जुन्या चालीप्रमाणे रहात होता . तर ह्या जगन्नाथला चाळीतील प्रत्येंकचा इतिहास तोंडपाठ होता. (अर्थात स्वतःचा इतिहास लपवून. आजच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास जगन्नाथ फारच हुन्नरी व चौकोनी चिरा असलेली व्यक्ती होती . मग त्यात राजकारण. सिनेमाक्षेत्र त्याचे दिग्दर्शन असो की आणखी कोणतेही क्षेत्र असो . त्या त्या प्रत्येंक क्षेत्रात तो स्वतःला हिरो म्हणून पहात असे . व त्या क्षेत्रातील एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचे 'काय चुकले " हे सांगायचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा तो वावरत असे . उदा.- आमच्या चाळीतील अशोक शिंदेला ऑफिसला जाताना लोकलमध्ये एका श्रीमंत व्यक्तीची विसरलेली पैसें व महत्वाच्या कागदपत्रांची बॅग सापडली . अशोकने प्रामाणिकपणे त्या बॅगेतील पत्त्यावरून ती बॅग त्या श्रीमंत व्यक्तीच्या हवाली करून टाकली . त्या श्रीमंत व्यक्तीने शिष्टचार म्हणून अशोकला ताजमहाल हॉटेलमध्ये चहा पाजला .
ही हकीकत जेव्हा चाळीत पसरली ठेवा आमही मिंत्रानी अशोकचे कौतुक केले . पण जगन्नाथने मात्र अशोकाला वेड्यात काढले . तो म्हणाला 'अरेरे असे का केले . फक्त चहा प्याला ? लेक सुवर्णसंधी घालवली तू . मी त्या जागी जर असतोना तर चांगले गोड बोलून चिकनच्या जेवणावर ताव मारला असता ताजमहाल हॉटेलमध्ये काही उपयोग नाही बघा तुमचा ह्या मुंबईत राहून '. अरे -नंतर खालच्या आवाजात म्हणाला ' निदान बॅगेत एवढा पैसा होता त्यातील एखादी १०० रुपयाची नोट काढून घेऊन खिशात ठेवायची . काय कळले असते त्या माणसाला . जरी शंका आली असती तरी बॅगेत एवढेच पैसा होता म्हणून सांगता आले असते. नाहीतरी कागदपत्रे जास्त होती सर्व पैसा घरी काढून ठेवून तशीच दुसऱ्या दिवशी बॅग द्यावयाची कसे कळत नाही तुम्हाला ? कधी सुधारणा होणार तुमच्यात ?जाऊ द्या म्हणा खरेतर मलाच बॅग सापडाव्यास हवी होती
वगैरे ..."
आमच्या चाळीमध्ये आम्हा ७/८ तरुण मुलांपैकी जगन्नाथ फक्त २/३/वर्षाने मोठा होता. त्यामुळे आम्हा सर्वाना आमच्या घरचांपेक्षा आम्हाला सर्व बाबतीत अक्कल शिकवण्याचा अधिकार असल्यासारखा
जगन्नाथ वागत असे. मग आमच्या चाळीत कुणी तरुण मित्रांपैकि रंगनाथ वाकडेचे लग्न ठरले तेव्हा हसत आम्ही सर्वानी त्याचे अभिनंदन केले . तितक्यात जगन्नाथची स्वारी आली . आणि म्हणाली " काय रंग्या लग्न ठरवले का शेवटी . अरे सगळी जवानी खाली मान घालून रस्त्याने जाण्यात घालवली . मुलगी म्हणजे काय माहिती आहे कां ? प्रेम कसे करावे ? लग्नानंतर बायकोशी कसे वागणार ? नुसतंच आडनाव वाकडे कधी कॉलेजमध्ये ऑफिस मध्ये मुलींकडे वाकडी नजर करून पाहिलें नाही . उद्या बायकोनेच तुझ्यावर नजर ठेवली तर तुझे कसे होणार बाबा ? मलाच एक दोस्त म्हणून चिंता लागली आहे तुझी . चल चल तुला समजावून सांगतो सगळं " असे म्हणून आमच्यातून त्याला बाजूला घेऊन गेला . त्यात विशेष महत्वाची बाब म्हणजे या जगन्नाथचे तर अजिबात लग्न झालेले नव्हते .
लहानपणापासून जगन्नाथ उपद्वापी व खोडकर बढाईखोर असा होता. तो नेहेमी अप्रत्यक्ष खोड्या काढावयाचा वा वर संभावितपणे सारवासारव करून प्रकरण स्वतःच्या अंगाशी न लागू देता दुसऱ्यावर शेकावयाचा .मी त्याच्या शाळेतील एक वर्गात शिकत असताना .त्याच्या वर्गातील शिकवणारे देशमुख सर हे जुन्या पद्धतीची ढगाळ सरळ सोट पॅन्ट रोज घालून यावयाचे , एकदा देशमुख सर तासावर शिकवत असताना जगन्नाथचे शिकवण्यावर लक्ष नव्हते तो हळूच शेजारच्याला म्हणाला " काय रे सुन्या सरांची जि ढगाळ काळी पॅन्ट आहे तर त्याची एक बाजू जर बंद केली तर अंदाजे किती किलो धान्य मावेल " ते ऐकून सुन्याला हसू आवरेना . पण देशमुख सरांच्या कानावर कुजबुज पोहचली .ते रागा रागाने तरा तरा चालत येऊन म्हणाले "इकडे ये सुन्या तुला दाखवतो माझ्या पॅन्टमध्ये किती धान्य मावेल ते " असे बोलून सुन्याच्या हातावर तीन जोरात छड्या मारल्या , त्यावेळी जगन्नाथ निष्पाप चेहेरा करून हसत बसला होता . असा हा जगन्नाथ . प्रत्येंक गोष्टीत आरंभशूर असे एखादी गोष्ट किंवा एखादा उपक्रम चाळीत सुरु करून द्यावयाचा आणि मग स्वतः काही तरी बहाणा करून काढता पाय घेऊन दुसरीकडे जायचा . मुळात एखादी गोष्ट किंवा काम पूर्णत्वाला नेण्याइतपत त्याचा पिंड व हुशारी नव्हती . परंतु ते तो चतुरपणे झाकून ठेवण्यात सराईत असे .
एकदा चाळीमध्ये त्याने अशी टुम काढली कि हिवाळामध्ये पहाटे चाळीतील सगळ्या मुलांनी बाहेर रनिंग करावयाची रनींगचा व्यायाम पहाटे तरुण वयामध्ये करणे शरीराला चांगले असते . वगैरे ... प्रत्येंक मित्रांच्या घरी त्याने घरच्या माणसांना पटवून दिले . कारण घरच्या मंडळींना त्यावेळी आमच्यापेक्षा जगन्नाथवर जास्त विश्वास होता. मग पहाटे उठून आम्हीं पाळण्यास सुरुवात केली . पहिले २/३ दिवस जगन्नाथ स्वतः जातीने पहाटे रनिंगसाठी आम्हाला झोपेतून उठवण्यास आला . नंतर आम्हाला म्हणाला "अरे मित्रानो उद्या मला पहाटे उठविण्यास या बरका " मग आम्ही दुसरे दिवशी पहाटे त्याला उठवण्यास गेलो . त्या दिवशी पहाटे जगन्नाथ जरा कण्हत कण्हत दाराबाहेर आला व कसा तरी आमच्याबरोबर पहाटे पळण्यासाठी साठी आला .
त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही परत पहाटे उठवण्यास गेल्यावर घरातूनच तो कण्हत म्हणाला " अरे मित्रानो आज मी काही येत नाही माझा पाय फार जोरात दुखत आहे . तरी सुद्धा चिकाटीने त्याच्या दुसरी दिवशी परत पहाटे त्याला उठवण्यासाठी गेलो तेव्हा त्याचे वडील घरातूनच ओरडले ' ऐ पोरांनो तो आज येणार नाही रे आजारी आहे म्हणून " झाले .. अशा रीतीने हि पहाटे पळण्याची टुम पण बारगळली .
तर असा हा जगन्नाथ सतत आम्हाला अडचणीत आणत असे .आमच्या सर्व मिंत्रांची जगन्नाथला अडचणीत आणण्याची एकमेव मनीषा होती . आणि.. ध्यानी मनी नसताना एकदा आम्ही अडचणीत न येता खुद्ध जगन्नाथ त्याच्या स्वतःच्या स्वभावामुळे अडचणीत सापडला . मुंबईच्या दिवसानुदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या वातावरणामुळे सतत काही तरी सनसनाटी घडावे असे नेहेमी जगन्नाथला वाटत असे.
अचाट साहस व सतत हीरोगिरीची स्वप्ने जगन्नाथ पहिल्यापासून पहात असे . ह्याची आम्हाला सुद्धा कल्पना होतीच . आणि त्यात सर्वात कहर म्हणजे जगन्नाथला रहस्य कथा . रहस्य कादंबरी गुन्हेगारी .इंग्रजी चित्रपटांचे पहिल्यापासून वेड होते . कुठलीही रहस्य कथा इंग्रजी सिनेमा ह्यांची हकीकत. तो आम्हाला जबरदस्तीने ऐकावयाचा . अगदी आमची आवड नसतानाही .
... आणि नेमक्या याच कालावधीमध्ये दादरला एक खासगी बँकेमध्ये भर दिवसा अज्ञात ३/४
गुन्हेगार बुरखेधारी व्यक्तींनी बँकेतील कॅशियरयाला बंदुकीचा धाक दाखवून पैसाच्याची थैली पळवली हि बातमी त्याने आम्हाला सर्वात पाहिलांदा सांगितली . जसा काही हा बँक लुटीचा प्रकार त्याने स्वतः डोळ्याने पहिला होता. अशा आवेशाने सांगितली . आणि त्याचबरोबर मी जर त्या बँकेत हजर असतो तर नक्कीच त्यातील एका बुरखेधारीला पकडले असते. अगदी रेडहॅण्ड . अशी पुष्टीही जोडली . आणि त्यानंतर तो संभावितपणे म्हणाला की "पोलिसानी नागरिक व सामाजिक संस्थांनीहि दक्ष रहावयास व कोणी अज्ञात इसम आपल्या परिसरात दिसत असल्यास दिसल्यास त्याच्या हालचाली पोलिसाना कळवण्याचे आव्हानही केले आहे वगैरे ,
साधारणतः दादरच्या बँक लूटीला १ महिना पूर्ण होऊन गेला होता. परंतु हि गोष्ट जगन्नाथाच्या मनात पूर्णपणे ठसली होती. त्याने हि गोष्ट आम्हाला सांगितली कि ते बँक लुटेरे आता गप्प बसणार नाहीत. दिवस ढवळ्या चोरी करतात म्हणजे रात्री तर एकदम आरामात दरोडा टाकतील. आणि तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने . आता आपण सर्व मित्रांनी रात्री रोज एक राऊंड मारला पाहिजे . कारण आपल्या चाळीपलीकडे अमेरिकेची 'ग्रीन अर्थ " बँक चालू झाली आहे तिथे राऊंड मारला पाहिजे . असे जगन्नाथ आमच्या जवळ बोलला . परंतु आम्हीं कोणताही प्रतिसाद जगन्नाथला दिला नाही . कारण आम्हाला त्याचा स्वभाव माहित होता .
दुसरे दिवशी जगन्नाथन एकट्याने राऊंड मारण्यास सुरवात केली . त्याने विचार केला न जाणो अमेरिकन बँकेची भारतात मुंबईमध्ये शाखा असली म्हणजे बराच पैसा व आर्थिक व्यवहार त्या ग्रीन अर्थ मध्ये होत असला पाहिजे . ह्यांची जगन्नाथला खात्री पटली . रोज रात्री एक राऊंड तो त्या बँकेभोवती मारत असे . न जाणो मागचा बँक लुटीचा प्रकार दिवस घडला तसा आता तो रात्रीपण घडू शकेल . असा विश्वास जगन्नाथला वाटत होता .
.. आणि एके दिवशी रात्री असाच जगन्नाथ रात्री १० वाजता राऊंड मारण्यास निघाला असता जवळपास ७/८ माणसे ग्रीन अर्थ बँकेच्या गल्लीतील मध्ये रस्ता सोडून समोरच्या बिल्डिंगमधील अशोक इलेकट्रोनिक लिमिटेड च्या ऑफिसपासून खड्डा खणण्यास सुरवात करीत होती . त्यांच्यापैके २/३ माणसांच्या हातात प्रखर हॅन्ड लॅम्प होते हे सर्व काम बँकेच्या मागच्या दरवाजापासून सुरु होते . जगन्नाथला गप्प बसवेना . त्याने त्यातील एकाला हटकले व विचारले ' काय हो कसले काम चालले आहे ?' त्यावर त्या माणसाने काहीच उत्तर न देता फक्त रागाने जगन्नाथ कडे बघितले .व आपले खणण्याचे काम चालू ठेविले . थोड्या वेळाने जगन्नाथन परत येऊन तेथील दुसऱ्या माणसाला हळूच विचारले ' काय हो कसले काम चालले आहे ?. त्या दुसऱ्या माणसाने त्रासिक चेहेरा करून काय कटकट आहे ह्या भावनेने उत्तर दिले " त्याचे काय आहे की हि जी समोरची बिल्डिंग आहे ना त्यातील गटार तुंबले आहे . सर्व बिल्डिंगमधील बाथरूम चेकअप झालेली आहेत मग पाइप बसवून समोर जे बँकेचे ड्रेनेज आहे ना त्याला जोडून देण्याचे काम चालू आहे '.असे उत्तर देऊन तो मनुष्य म्हणाला ' जा आता लागा तुमच्या कामाला "असे म्हंटल्यावर बाकीचे सर्व माणसे मोठयाने हेटाळणीच्या स्वरात हसली . ते बघून जगन्नाथाची मनोमान पक्की खात्री पटली . है प्रकारात नक्की काहीतरी काळंबेरं डाव आहे. यांच्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे . तिथून निघून जगन्नाथने इकडे तिकडे थोडा टाइम पास केला , १/२/सिगरेट ओढल्या . व मनाशी म्हणाला ' चला आता रात्रभर जागे रहावे लागणार आहे . नंतर थोड्या वेळाने परत ती माणसे काम करीत असल्या ठिकाणी आला . व त्यातील एकाला म्हणाला "काय हो दमला असाल तुम्ही चला सिगरेट वगैरे मारू " त्यावर तो माणूस परत जग्गनाथवर रागाने खेकसला "ऐ बाबा जा ना येथून आता .तुला काय झोप वगैरे आहे कि नाही ? करू देना आम्हाला आमचे काम " ह्यावर बाकीचे सर्व माणसे परत मोठानी हसली व म्हणाली ' जाऊ द्या इथलाच कुणीतरी वेडा मनुष्य दिसतोय " असे म्हणून परत खड्डा खणण्याचा कामाला लागली . आता पर्यंत त्यांनी बराच मोठा पल्ला खणून काढला होता . आता फक्त बॅंकेच्या मागच्या दारापर्यंत १५-२० फूट लांब अंतर खणण्याचे काम राहिले होते . त्यानंतर जगन्नाथन घड्याळात पहिले तेव्हा पहाटेचे साडे तीन वाजले होते . मग जगन्नाथन विचार केला , "साल्यानी आपल्याला २ वेळा चांगलेच टोलवाले म्हणजे नक्कीच हे माणसे सराईत व हुशार लुटेरे असले पाहिजेत . मग त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली त्याने तडक खोदकाम ज्या बिल्डिंगपासून सुरु झाले होते . थेतील बिल्डींगच्या रखवालदाराला गाठले . तो रात्रपाळीचा रखवालदार नेहेमीप्रमाणे चांगल्या डुलक्या घेत होता . त्याला एकदम उत्साहाने जगन्नाथन उठवले व विचारले . " काय हो ह्या बिल्डिंगची पाइप लाइन चोकअप होऊन तुंबले आहे काय ?" त्यावर तो रखवालदार अर्धवट झोपेत मोठयाने हसला . व म्हणाला " काय लोकं आहेत . रात्रीसुद्धा बाथरूमच्या कामाची चौकशी करतात . " त्यावर जगन्नाथन त्याला त्या बिल्डिंगपासून खड्डा खणणाऱ्या माणसांविषयी सांगितले " तुला माहित आहे का ? ते लोकं खड्डा खणत आहे ते " त्यावर रखवालदार एकदम उठून म्हणाला " नाही हो ह्या बिल्डिंगमध्ये कुठलेही बाथरूम चोकअप झालेले नाहीत , त्यावर जगन्नाथने
त्वरित सांगितले " चला चला आपण ताबडतोब आमच्या चाळीत जाऊन माझ्या मित्रांना घेऊन लगेच पोलीस चौकीत जाऊ या आणि त्याना रेडहॅण्ड पकडू या " त्यावर लगबगीने रखवालदार म्हणाला . " हो हो बरोबर आहे , साल्यांकडे पिस्तूल व इतर काही हत्यारे असली तर आपले काही चालणार नाही "त्यावर जगन्नाथला धीर आला . तो मनाशी म्हणाल " चला आपल्यामागे कुणीतरी आहे " मग तो रखवालदाराला घेऊन आमच्या चाळीत आला व आम्हा ४/५ मिंत्रांना घेऊन आम्हाला पोलीस चौकीत नेले , त्यावेळी इन्सपेक्टर सुरेश पवार नेमके ड्युटीवर सापडले . २/३ पोलिसाना घेऊन ते आमच्यासह ग्रीनअर्थ बॅंकेजवळ आलो . त्यावेळी खड्डा खाणारी ५/६/ माणसे अजून तिथेच होती . त्यांनी आत्तापर्यंत बँकेच्या मागील दारापर्यंत तो खड्डा पूर्ण केला होता .
इन्सपेक्टर पवारांनी खणखणीत आवाजात त्याना विचारले " काय रे काय चालले आहे ते " ? आमच्या बरोबर असलेल्या जगन्नाथाचा ऊर अभिमानाने भरून आला . मग तो पण आवाज मोठा करून म्हणाला" साहेब ह्या हरामखोरांना मी राऊंड मारताना २/३/वेळा विचारले . त्यावेळी त्यांनी टोलवाटोलवी केली " त्या खड्डा करणाऱ्या माणसांपैकी एक जण पुढे येऊन जगन्नाथकडे बोट दाखवून म्हणाला " साहेब .ह्याने रात्री आम्हाला रात्री काम करत असताना २/३/वेळा कामाचा खोळंबा केला डिस्टरब केले . थांबा तुमचा विश्वास बसणार नाही . आमचे साहेब ५/१० मिनिटामध्ये इथे येतील तेच तुम्हाला सविस्तर काय ते सांगतील " नंतर ५/ १० मिनिटे गेली सकाळचे ६ वाजले होते . तितक्यात एक पॉश व्यक्ती स्कुटरवरून तेथे आली . त्याने आपली ओळख करून दिली " इन्सपेक्टर साहेब मी रमेश ठाकूर .सॅमसन कॅबेल सिस्टिम चा मॅनेजर ' असे म्हणून त्याने ग्रीन अर्थ बँकेचे लेटर दाखविले आणि खुलासा केला " साहेब आम्ही बँकेची परवानगी घेऊन समोर जे अशोक इलेकट्रोनिकक्सचे ऑफिस आहे बरोबर तेथून अंडर ग्राऊंड फायबर प्लास्टिकचे केबल त्या ऑफिसपासून बँकेपर्यंत इंटरनेट कनेक्शनचे काम चालू केले " त्यावरून इन्सपेक्टरच्या लक्षात सर्व परिस्थिती आली . आणि ते म्हणाले " आणि नेमकी रात्रीचीच वेळ का? निवडली ह्या इंटरनेट `केबल कामासाठी ?
त्यावर रमेश ठाकूर म्हणाला " साहेब एक तर आमचे बऱ्याच ठिकाणी इंटरनेट `केबलचे काम चालू आहेत , आणि त्यात कामाच्या करारानुसार वेळ पण अत्यंत कमी आहे . त्यात आणखी दिवसा काम करणारी माणसे रात्री येऊ शकत नाही. त्यात दुसरे म्हणजे संध्यकाळपर्यंत ह्या रस्ताने कायम रहदारी व ये जा चालू असते बँकेतही गर्दी असते केवळ बँक गुप्ततेच्या अटीनुसार व बॅंकेत कायम विदेशी व्यवहार चालू असतात म्हणून दोन्ही ऑफिस च्या परवानगीने रात्रीची वेळ निवडली . त्यात बँकेचे सर्व व्यवहार वाढल्याने इंटरनेटसाठी आम्हाला काम दिले . आता खड्ड्याचे काम पूर्ण झाले आहे . फक्त कॅबेल फिटटींग राहिले आहे .समोरील अशोक इलेक्ट्रॉनिक कंपनीत ऑफिसात आम्हीच इंटरनेट सेट केला आहे . " मग इन्स्पेक्टर पवारांनी दोन्ही ऑफिसची लेटर बघितली . व रमेश ठाकूरांना कामात डिस्टरब केल्याची दिलगिरी व्यक्त केली . त्यावेळी जगन्नाथकडे बघून आमच्या सहित त्या कॅबेलवाल्याची माणसे हेटाळणीने जोरात हसली . तेथून आम्ही
जगन्नाथला घेऊन कसेबसे सटकलो .
पुढील १/२/दिवस जगन्नाथला पोलीस चौकीत चौकशीसाठी सारखे हेलपाटे घालावे लागले . त्याच्या हीरोगिरीबध्दल पोलिसानी त्याला चांगलेच फैलावर घेतले .
नंतर आमच्या नजरेला नजर देण्याचे धाडस जगन्नाथकडे राहिले नाही . त्याला त्याच्या हीरोगिरीबध्दल चांगलीच खोड मोडली होती . कसे बसे पोलीस प्रकरण आम्ही सर्वानी इन्सपेक्टर सुरेश पवाराबरोबर मिटवले
त्यावेळेपासून जगन्नाथने " मी त्या जागी असतो तर " हे वाक्य उचचारलेसुद्धा नाही ..
धन्यवाद

Comments
Post a Comment