।।विड्यात रंगली रात्र ।। (रहस्यमय कथा )
।।विड्यात रंगली रात्र ।। (रहस्यमय कथा ) प्रस्तावना -सदरहून हि कथा "शिवतेज ह्या दिवाळी अंकामध्ये २००१ ह्या वर्षी प्रसिद्ध झाली आहे . ह्या कथेत मी .रहस्य कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . ट्रिंग..ट्रिंग.. रात्रीचे तीन वाजता इन्स्पेक्टर दौलतराव मोकाशी ह्यांच्या घरातील फोन वाजू लागला . नुकतेच रात्री अकरा वाजता माने वस्तीवरील दरोड्याचा तपास करून येऊन झोपतो न झोपतो तोच रात्री ३ वाजता परत फोन , कशी बशी झोप आवरून . दौलतराव पोलीस चौकीवर हजर झाले. चौकीवर जाताच सर्व घटना समजली . तातडीने दौलतराव घटनास्थळी गुजरीबाई रहमान हिच्या कोठीवर गेले . तिथे विलासपूर गावातील नामवंत धनिक असामी धनाजीराव कर्दळे ह्यांचा खून झाला होता . रात्री साधारणतः एक वाजता धनाजीरावांचा नौकर विठोबा हा घाबरून ओरडत पोलीस चौकीवर आला होता. मग रीतसर केस नौदवून दौलतरावाने डेड बॉडी प...