Posts

त्या जागी मी असतो तर (नर्म विनोदी कथा )

                                                        त्या जागी मी असतो तर   (नर्म विनोदी कथा ) मनोगत -:   साप्ताहिक गगनझेप १९९९ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली हि कथा आहे . ह्या कथेत मी विनोदी लिहिण्याच्या प्रयत्न केलेला आहे.  साधारणतः ह्या दुनियेत  मानवाच्या चित्र विचित्र समुदायात आपल्यलाला अनेक माणसे भेटतात त्यामध्ये अनेक प्रकारचे नमुनेदार माणसे असतात . त्यात सर्वात स्वतःला काही तरी वेगळे व आपण इतरांपेक्षा किती वेगळे व सुपरमॅन आहोत हे दाखवणाचा काही विचित्र माणसे प्रयत्न करीत असतात अश्याच एका विचित्र माणसाची कथा इथे देत आहे ...    जगन्नाथ आगळंबे  त्याच्या नावाप्रमाणे विचित्र असलेली वल्ली . आपल्या नावातील जगाची उठाठेव करून त्यानुसार हिरोगिरी करणे हा त्याचा व्यवसाय . गिरगावातील आमच्या तात्या टंकलेच्या जुन्या चाळीत ठामपणे जुन्या चालीप्रमाणे रहात होता . तर ह्या  जगन्नाथला चाळीतील...

।।विड्यात रंगली रात्र ।। (रहस्यमय कथा )

                                                 ।।विड्यात रंगली रात्र ।।  (रहस्यमय कथा ) प्रस्तावना -सदरहून हि कथा "शिवतेज ह्या दिवाळी अंकामध्ये २००१ ह्या वर्षी प्रसिद्ध झाली आहे . ह्या कथेत मी .रहस्य कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .                ट्रिंग..ट्रिंग.. रात्रीचे तीन वाजता इन्स्पेक्टर दौलतराव मोकाशी ह्यांच्या घरातील फोन  वाजू लागला . नुकतेच रात्री अकरा वाजता माने वस्तीवरील दरोड्याचा तपास  करून येऊन झोपतो न झोपतो तोच रात्री ३ वाजता परत फोन , कशी बशी झोप आवरून . दौलतराव पोलीस चौकीवर हजर झाले. चौकीवर जाताच सर्व घटना समजली . तातडीने दौलतराव घटनास्थळी गुजरीबाई रहमान हिच्या कोठीवर गेले . तिथे विलासपूर गावातील नामवंत धनिक असामी धनाजीराव कर्दळे ह्यांचा खून झाला होता . रात्री साधारणतः एक वाजता धनाजीरावांचा नौकर विठोबा हा घाबरून ओरडत पोलीस चौकीवर आला होता. मग रीतसर केस नौदवून दौलतरावाने  डेड बॉडी प...

||ऋणानुबंध ||

                                                                         ||ऋणानुबंध ||          सदरहून हि कथा शिवतेज ह्या दिवाळी अंकात २००० साली प्रसिद्ध झालेली आहे. प्रामाणिकपणे  आपल्या गावाची सामाजिक सुधारणा व समाज एकीकरण्याच्या शुभ कार्यामध्ये अनेक अडचणी येत असतात . व ह्या सामाजिक कार्याचे  स्वरूप राजकारणाकडे  घेऊन जाते. व समाजसुधारणेचा हा पवित्र रस्ता राजकारणाच्या अनिष्ट मार्गाकडे जातो . ह्याचे प्रत्यन्तर ह्या कथेत आपल्याला दिसेल.              पहाटे साडेतीन च्या दरम्यान सदानंद पुन्हा पडले होते . विचारे दचकून उठला . आज पुन्हा तेच स्वप्न पुन्हा पडले होते. ... सदानंद रात्रीच्या गडद काळोखात चंदनपुरी गावच्या मोठ्या टेकडीवरील गणपतीच्या देवळात फक्त एकटा उभा आहे. मग देवळाच्या पायऱ्या चढून दुसरी आकृती पुढे येते. ती म्हणजे त्या...

।।वास्तवातील स्वप्न लघु कथा - स्वप्नी जे पाहिले ते सत्यात अवतरेल कां ।।

                                                                   ।।श्री।।                        ।।वास्तवातील स्वप्न लघु कथा -  स्वप्नी जे पाहिले ते सत्यात अवतरेल कां ।।        सदर हुन ही लघु कथा "दैनिक लोकमत " ह्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पेपर मध्ये "माझे स्वप्न " ह्या कॉलम मध्ये दिनांक -२५- ०२- २००२. साली  छापून आलेली आहे .                          'स्वप्न ' खरोखर स्वप्नासारखा सुंदर अनुभव देणारा .स्वप्न हा शब्दच जणू वास्तवातून स्वप्नाकडे घेऊन जातो. सुखाचा अनुभव देतो . प्रत्यक्ष्यात असे दिसते. की मनुष्याला त्याच्या वयानुसार . जगण्यातील अनुभवानुसार वेग वेगळी स्वप्न पडत असावीत त्यात पहाटेच्या प्रदूषणमुक्त वातावरणात पडलेली स्वप्ने खरी होतात असे ऐकलेले आहे ....

कथा - 1- ।।बांध ।। ग्रामीण कथा

                                                         कथा - 1-   ।।बांध ।।  ग्रामीण कथा                                   ( प्रसिद्धी -:साप्ताहिक तांबडी माती दिवाळी अंक -साल -२०००. )  मनोगत -आज भारताला स्वातंत्र मिळूनही इतके वर्ष झाले तरी एकीकडे देश घडविताना दुसरीकडे भारताच्या सरहद्दीला युद्धाचा धोका आजही जाणवत आहे . आज भारताला देशाच्या प्रगतीबरोबर सिमेचे सरंक्षण हि करावे लागत आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे . सिमेवर युद्धाचे संकट आले तरी भारतातील शहरी व ग्रामीण नागरिक देशासाठी आपले घरातील मोठ्या समस्या बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेसाठी अजूनही लढत आहे .  माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री  ह्यांनी "जय जवान जय किसान "हा मंत्र पूर्वीचा दिलेला आहे . त्यानुसार भारताची देशभक्ती घडत गेलेली आहे . ह्या युद्ध संकटावर हि कथा ल...